वाचा:
कागल तालुक्यातील सोनाळी येथील डॉ. रवींद्र पाटील यांचा मुलगा आजोबांच्या घराची वास्तुशांती आहे म्हणून चार दिवसापूर्वी सावर्डे बुद्रुकला गेला होता. वास्तुशांती झाल्यानंतर १७ ऑगस्टपासून तो बेपत्ता होता. त्याचे अपहरण झाल्याची फिर्याद वडिलांनी मुरगूड पोलिस ठाण्यात दिली होती. गेले चार दिवस त्याचा शोध सुरू होता. कागल तालुक्याबरोबरच जिल्हा तसेच कर्नाटकातही याचा शोध घेतला, पण तो आढळला नाही.
वाचा:
आज सकाळी सावर्डे बुद्रुक येथील तलावात त्याचा मृतदेह दिसला. त्याच्या अंगावर मारहाणीच्या जखमा आहेत. यामुळे त्याचा खून करून मृतदेह तलावात टाकल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. दरम्यान, हा नरबळीचा प्रकार असल्याचा संशय व्यक्त होत आहे. स्वतःला मूल होत नाही म्हणून मित्राच्या मुलाचा नरबळी दिल्याचा आरोप मृत मुलांचे वडील रवींद्र पाटील यांनी केला आहे. या घटनेमुळं जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. मारुती वैद्य असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून तो रवींद्र पाटील यांचा मित्र आहे. मुरगुड पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.
फोटोगॅलरी:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times