किरीट सोमय्या हे सतत सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांवर आणि मत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत आहेत. शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांच्या बालाजी पार्टीकल बोर्ड कारखान्यावर १०० कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप सोमय्या यांनी केला होता. वाशिम दौऱ्यावर असलेले किरीट सोमय्या आज बालाजी पार्टीकल बोर्ड कारखान्याची पाहणी करण्यासाठी येत होते. मात्र, खासदार भावना गवळी यांच्या समर्थकांनी किरीट सोमय्या यांना काळे झेंडे दाखवले आणि त्यांच्या ताफ्यावर दगडफेक केल्याचे सांगितले जात आहे.
क्लिक करा आणि वाचा-
या दगडफेकीनंतर किरीट सोमय्या घटनास्थळावरून तत्काळ निघून गेले. ही घटना घडल्यानंतर घटनास्थळी नागरिकांची गर्दी जमली होती. पोलिसांनी ही गर्दी पांगवण्याचा प्रयत्न केला. मात्र गर्दी हटायला तयार नसल्याने शेवटी पोलिसांनी लाठीचार्ज केला. त्यानंतर गर्दी पांगली.
क्लिक करा आणि वाचा-
सोमय्यांनी केला होता खासदार भावना गवळींवर आरोप
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेनेच्या यवतमाळ-वाशिमच्या खासदार भावना गवळी यांच्यावर १०० कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. बालाजी पार्टीकल बोर्ड या कारखान्यात खासदार गवळी यांनी हा १०० कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप सोमय्या यांनी केला होता.
क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times