वाचा:
फडणवीसांनी या संदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे. ‘ज्योती देवरे यांनी ११ मिनिटांची एक ऑडिओ क्लिप जारी करून स्थानिक लोकप्रतिनिधीवर आणि वरिष्ठ अधिकार्यांवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. लसीकरणावरून काही कर्मचार्यांना पोलिस अधिकार्यांच्या समोर मारहाण करणे, अश्लील शिविगाळ करणे, महिला कर्मचार्यांना मारण्यासाठी महिला पोलिसांना बोलाविण्यास सांगणे, जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलिस अधीक्षकांपर्यंत प्रकरण नेल्यानंतर तहसीलदार ज्योतीताई देवरे यांच्याच बदनामीचा प्रयत्न करणे, वरिष्ठ अधिकार्यांकडूनही त्यांना धमक्या येणे, करोना काळात नियमांचे पालन करण्याचा प्रयत्न करीत असताना त्यातही अडचणी उत्पन्न करणे आणि मग थेट मंत्र्यांकडे त्यांच्या बदलीची शिफारस करणे, यातून महिला अधिकार्यांचे खच्चीकरण करणे, असे आरोप देवरे यांनी केल्याचं फडणवीसांनी पत्रात म्हटलं आहे.
वाचा:
‘दीपाली चव्हाण प्रकरणाचा उल्लेख करून मी सुद्धा तुझ्याकडे येतेय हा त्यांचा ऑडिओमधील आवाज अंगावर शहारे आणणारा आहे. एक स्त्री अधिकारी आपले कर्तव्य पार पाडत असताना संपूर्ण यंत्रणाच तिचे मानसिक खच्चीकरण करीत असेल आणि परिणामी त्या महिला अधिकार्याला आत्महत्येचा इशारा द्यावा लागत असेल तर ही बाब अतिशय गंभीर आणि मनाला वेदना देणारी आहे,’ याकडं फडणवीसांनी लक्ष वेधलं आहे.
वाचा:
‘खरे तर करोना काळात संपूर्ण यंत्रणा दबावात काम करीत असताना त्यांना आणखी नाहक त्रास होणार नाही, याची काळजी घेतली जाणे अतिशय आवश्यक आहे. आपण यात तत्काळ लक्ष घालून हस्तक्षेप करावा. या महिला अधिकार्याला आपण स्वत: बोलावून घेऊन त्यांची तक्रार ऐकून घ्यावी आणि त्यांच्या व्यथा समजून घ्याव्यात आणि तत्काळ त्यावर तोडगा काढून त्या अधिकार्याला न्याय द्यावा,’ अशी विनंती फडणवीस यांनी केली आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times