सांगली : सर्वोच्च न्यायालयाचा बंदी आदेश झुगारून बैलगाडा शर्यतीचे आयोजन केल्याबद्दल आमदार (BJP ) यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. आमदार पडळकर यांच्यावर आटपाडी पोलीस ठाण्यात करण्यात आला.

आटपाडी तालुक्यातील वाक्षेवाडी येथे शुक्रवारी सकाळी बैलगाडी शर्यत पार पडली. सर्वोच्च न्यायालयाचा बंदी आदेश आणि जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केलेल्या संचारबंदीचे उल्लंघन केल्याबद्दल आमदार पडळकरांसह ४० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चौकशीनंतर दोषींवर कायदेशीर कारवाई होणार असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

गेल्या चार दिवसांपासून चर्चेत असलेली झरे (ता. आटपाडी) येथील बैलगाडा शर्यत अखेर शुक्रवारी पहाटे पार पडली. शर्यतीचे आयोजन होऊ नये यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी आटपाडी तालुक्यात संचारबंदी जाहीर केली होती. झरे गावासह आसपासच्या नऊ गावांमध्ये नाकाबंदी करण्यात आली होती. पोलिसांनी आमदार पडळकरांसह आयोजनात सहभागी असलेल्या झरे गावातील ग्रामस्थांना नोटिसा पाठवल्या होत्या. यानंतरही शुक्रवारी पहाटे पोलिसांना चकवा देत बैलगाडी शर्यत पार पडली.

शर्यतीचे व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर आमदार पडळकर यांनी जिल्हा प्रशासनाला धोबीपछाड दिल्याची चर्चा जिल्ह्यात सुरू होती. तसंच यावर पोलीस काय कारवाई करणार याकडेही सर्वांचं लक्ष लागलं होतं.

अखेर शुक्रवारी संध्याकाळी आटपाडी पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करून बैलगाडा शर्यत पार पाडल्याबद्दल आमदार पडळकरांसह ४० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. संचारबंदीचे उल्लंघन आणि आपत्ती व्यवस्थापन अधिनियमांचे उल्लंघन केल्याबद्दलही आमदार पडळकरांवर कारवाई होणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी दिली. याबाबत अधिक तपास आटपाडी पोलिसांकडून सुरू आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here