याबरोबरच, मुंबईत आतापर्यंत एकूण ७ लाख १९ हजार ३८१ रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत एकूण १५ हजार ९४१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईतील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ९७ टक्के इतके असून कोविड रुग्णवाढीचा दर ०.०३ टक्के इतका खाली आला आहे. त्याचवेळी मुंबईतील रुग्णदुपटीचा कालावधी आता २ हजार ०५२ दिवसांवर जाऊन पोहचला आहे.
क्लिक करा आणि वाचा-
मुंबईत आज ५६ हजार ५६६ चाचण्या
मुंबईत आज एकूण ५६ हजार ५६६ कोविड चाचण्या करण्यात आल्या असल्याचे मुंबई महानगरपालिकेने सांगितले आहे. सध्या झोपडपट्टी व चाळींमध्ये एकही सक्रिय कंटेनमेंट झोन नसून एकूण २४ इमारती सील करण्यात आल्या आहेत.
क्लिक करा आणि वाचा-
आज संध्याकाळी ६ वाजेपर्यंतची स्थिती
२४ तासांत बाधित रुग्ण – ३२२
२४ तासात बरे झालेले रुग्ण – २२३
बरे झालेले एकूण रुग्ण – ७१९३८१
बरे झालेल्या रुग्णांचा दर – ९७%
एकूण सक्रिय रुग्ण- २८५३
रुग्ण दुपटीचा कालावधी- २०५२ दिवस
कोविड वाढीचा दर (१३ ऑगस्ट ते १९ ऑगस्ट)- ०.०३ %
क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times