‘दोनवेळा करोना प्रतिबंधक लस घेऊन सुद्धा माझी करोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. करोनाचा धोका पूर्णपणे टळलेला नाही याची प्रचिती मला आलेली आहे. हा डेल्टा व्हेरीएंट असू शकतो. कारण तो लस घेतल्यानंतरची प्रतिकारशक्ती सुद्धा भेदू शकतो. त्यामुळे लस घेतली म्हणजे धोका टळला असे समजून गाफिल राहू नका. सर्वांनी करोनाचे नियम निर्बंध काटेकोरपणे पाळा,’ असं अमोल कोल्हे यांनी म्हटलं आहे.
शासकीय रुग्णालयात उपचार
‘महाराष्ट्र शासनाची सार्वजनिक आरोग्यव्यवस्था सक्षम असून यावर माझा विश्वास आहे. म्हणूनच करोना पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्यानंतर शासकीय रुग्णालयाचा पर्याय निवडला. त्यानुसार मुंबई महापालिकेच्या ‘सेव्हेन हिल्स रुग्णालयात’ उपचारासाठी दाखल झालो आहे. आपण आपल्या व्यवस्थांवर विश्वास दाखवला पाहिजे,’ असं मत कोल्हे यांनी व्यक्त केलं आहे.
दरम्यान, विविध माध्यमातून माझे हितचिंतक काळजी व्यक्त करत आहेत, शुभेच्छा देत आहेत त्यांचे मनापासून आभार मानतो, असंही अमोल कोल्हे यांनी यावेळी म्हटलं आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times