मनसे शाखा अध्यक्षांच्या मेळाव्याबरोबरच शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्यांना राज ठाकरे यांच्या हस्ते बक्षीस दिली जाणार आहेत.
क्लिक करा आणि वाचा-
जातीयवादाच्या वक्तव्यावरून सध्या राज ठाकरे विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असा सामना रंगलेला दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्माबरोबर जातीचा मुद्दा मोठा झाला असे राज ठाकरे म्हणाले होते. त्यावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया न व्यक्त करता राज ठाकरे यांना प्रबोधनकार ठाकरे यांचे लिखाण वाचण्याचा सल्ला दिला होता. त्यावर राज ठाकरे यांनी पु्ण्यातूनच जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर केलेल्या टीकेवर आपण ठाम असल्याचे म्हटले आहे.
क्लिक करा आणि वाचा-
मला प्रबोधनकार ठाकरे यांचे लिखाण वाचण्याचा सल्ला देण्यात आला असला तरी मी सर्वांची पुस्तके वाचली आहेत. यशवंतराव चव्हाण यांचे विचारही मी वाचले आहेत. प्रबोधनकरांचे संदर्भ त्या काळातले होते, असे सांगताना माझ्या आजोबांचे लिखाण आपल्याला हवे तेवढेच घ्यायचे असे चालणार नाही, असे राज ठाकरे म्हणाले. मी यशवंतरावांबाबतही वाचले असून त्यांचेही मत काय होते हे मला माहिती आहे, असा टोलाही त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला लगावलाय.
क्लिक करा आणि वाचा-
राज ठाकरे यांची भूमिका पाहता येत्या काही दिवसात मनसे विरुद्ध राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष यांच्यातील हा मतभेद अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times