‘सर्वांना सुरक्षित बाहेर काढणार’
काबुल विमानतळ सुरक्षित करण्यात आलं आहे. यामुळे लष्करी आणि इतर देशांच्या नागरिकांची चार्टर विमानं उड्डाण घेऊ शकतील. तसंच अफगाणिस्तानच्या असुरक्षित नागरिकांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या बिगर सरकारी संस्थांसाठी उड्डाणं सुरू केली जातील. अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या अमेरिकेच्या सर्व नागरिकांना सुरक्षित बाहेर काढलं जाईल, असं आश्वासन त्यांनी दिलं.
‘आतापर्यंत १८ हजार नागरिकांना बाहेर काढलं’
तालिबानपासून वाचवण्यासाठी अमेरिकेच्या नागरिकांसह इतर देशांचे नागरिका आणि असुरक्षित अफगाण नागरिकांसाठी मोठ्या प्रमाणावर मोहीम राबवली जात आहे. जुलैपासून ते आतापर्यंत १८ हजार नागरिकांना सुरक्षित बाहेर काढलं आहे. १४ ऑगस्टला सैन्याकडून एअरलिफ्ट सुरू झाल्यानंतर जवळपास १३ हजार नागरिकांना बाहेर काढल्याचं बायडन म्हणाले.
आता अफगाणिस्तानच्या भूमिवर अमेरिकेचे ६ हजार सैनिक तैनात आहेत. हे सैनिक काबुल विमानतळाच्या धावपट्टीला सुरक्षा देत आहेत. काबुल विमानतळाजवळ माउंटेन डिव्हिजनचे मरीन कमांडो नागरिकांना विमानांमध्ये जाण्यासाठी सहकार्य करत आहेत. ही मोहीम इतिहासातील सर्वात कठीण आणि सर्वात मोठ्या एअरलिफ्ट पैकी एक आहे, असं जो बायडन म्हणाले.
‘३१ ऑगस्टपर्यंत पूर्णपणे सैन्य माघारीचे लक्ष्य’
अफगाणिस्तानमधून आपल्या सैनिकांना माघारी बोलावण्याचे सीमा ३१ ऑगस्टपर्यंतची आहे. त्यापूर्वी हजारो नागरिकांना अफगाणिस्तानमधून बाहेर काढलं जाईल. आता या मोहीमेला वेग दिला जाईल, असं बायडन यांनी सांगितलं. अमेरिकेच्या २५० नागरिकांसह ५,७०० नागरिकांना १६ सी-१७ या वाहतूक विमानांद्वारे काबुलमधून बाहेर काढण्यात आलं आहे. गेल्या दोन दिवसांत २००० नागरिकांना बाहेर काढण्यात आलं आहे, अशी माहिती एका सुरक्षा अधिकाऱ्याने दिली.
अफगाणिस्तानमध्ये अजून अमेरिकेचे किती नागरिक आहेत, याची पडताळणी केली जात आहे. अफगाणिस्तान सोडून ज्या अमेरिकेच्या नागरिकांना परत यायचं आहे, त्या सर्वांना परत आणलं जाईल. आतापर्यंत अमेरिकेच्या २०४ पत्रकारांना बाहेर काढण्यात आलं आहे. नागरिकांना बाहेर काढण्यासाठी काबुल विमानतळावर कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. काबुल विमानतळाजवळ बारकाईने नजर ठेवून आहोत. कुठल्याही दहशतवादी हल्ल्याचा धोक्याबाबत आम्ही सावध आहोत, असं बायडन म्हणाले.
काबुल विमानतळावर सर्व नागरिक सुरक्षितपणे पोहोचण्यासाठी अमेरिका तालिबानच्या सतत संपर्कात आहे. तसंच अमेरिकेच्या सर्व मित्र देशांचा आमच्यावर विश्वास आहे. काबुल विमानतळाच्या पुढे जाऊन अमेरिकेच्या सैनिकांची सुरक्षा वाढवल्यास अनुचित प्रकार घडण्याची शक्यता आहे. यामुळे विमानतळावर अमेरिकेची सुरक्षा आहे. तालिबानने अमेरिकेच्या कुठल्याही नागरिकाला विमानतळावर जाण्यापासून रोखल्याचे संकेत नाहीत. तरीही नागरिकांना सुरक्षितपणे काबुल विमानतळापर्यंत नेण्यासाठी अमेरिकेच्या सैनिकांची मदत देण्याबाबत विचार केला जाईल. तसंच अफगाणिस्तानच्या मुद्द्यावर पुढच्या आठवड्यात G7 बैठक होणार आहे, असं अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी सांगितलं.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times