मुंबईः मुंबईचे माजी पोलीस आयुक्त ()व बडतर्फ एपीआय सचीन वाझे (Sachin Vaze) यांच्या विरुद्ध गोरेगाव पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी रात्री हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

परमबीर सिंह यांच्यावर एकापाठोपाठ गुन्हे दाखल होत असल्याने त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. यावेळी सचिन वाझे हेही या प्रकरणात आरोपी असल्यानं हे प्रकरण अधिकच गंभीर बनत चालले आहे. हॉटेल चालकाकडून जानेवारी २०२० ते ऑगस्ट २०२० या कालावधीमध्ये ११ लाखांची वसुली केल्याचा आरोप परमबीर सिंह यांच्यावर करण्यात आला आहे. तसंच, छापा न टाकण्यासाठी दर महिना खंडणीचे टार्गेट दिल्याचंही तक्रारीत म्हटलं आहे.

दरम्यान, पोलिस निरीक्षक अनुप डांगे यांनीही परमबीर सिंह यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. परमबीर सिंह यांच्या विरोधात दाखल खंडणीच्या गुन्ह्यातील साक्षीदारांवर दबाव टाकला जात असल्याचा आरोप तक्रारदार पोलिस निरीक्षक अनुप डांगे यांनी केला आहे. आपल्यावरही पाळत ठेवली जात असल्याचे डांगे यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस संचालकांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

वाचाः

परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटींच्या खंडणी वसुलीचा आरोप केला होतं. तसं पत्र त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहलं होतं. या पत्रावरुन मोठी खळबळ उडाली होती. त्यानंतर परमबीर सिंह यांच्याविरोधातही खंडणीचे गुन्हे दाखल झाले आहेत.

वाचाः

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here