मिळालेल्या माहितीनुसार, ही मॉडेल आणि अभिनेत्री दोन तासांसाठी दोन लाख रुपये घेत असे. मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने जुहू येथील एका पंचतारांकित हॉटेलमधून त्यांना पकडले आहे. या मॉडेल आणि अभिनेत्रींना मुंबई पोलिसांनी अटक केली नसली तरी त्यांना सेक्स रॅकेटच्या या जाळ्यातून बाहेर पडण्याचा सल्ला देण्यात आला आहे. अभिनेत्री आणि मॉडेलऐवजी रॅकेट चालवणाऱ्या महिलेला अटक करण्यात आली आहे.
अटक केल्यानंतर चौकशीत ईशा खानने सांगितले की, ती गेली अनेक वर्षे हे सेक्स रॅकेट चालवत आहे. ती दोन तासांसाठी दोन लाख रुपये घेत असे. यामध्ये ती तिचे ५० हजार रुपये कमिशन ठेवायची आणि उरलेले दीड लाख रुपये संबंधित मॉडेल आणि अभिनेत्रीला द्यायची.
मॉडेल आणि अभिनेत्रीने सांगितले सेक्स रॅकेटमध्ये सामील होण्याचे कारण…
चौकशी दरम्यान, मॉडेल आणि अभिनेत्रीने सांगितले की, करोनामुळे लॉकडाऊन झाल्यामुळे शूटिंग थांबले होते, काम उपलब्ध नव्हते. म्हणूनच ती सेक्स रॅकेटमध्ये सामील झाली. हे रॅकेटमध्ये ईशा खान ग्राहकांशी संपर्क साधायची. ती मॉडेल, अभिनेत्री आणि कॉल गर्ल्सची प्रोफाइल आणि छायाचित्रे ग्राहकांसोबत शेअर करायची. ज्या ग्राहकांना आवडले त्यांच्यासोबत दर, तारीख आणि वेळ निश्चित केली जायची. मग जुहूसारख्या पॉश भागात असलेल्या हॉटेल्समध्ये खोल्या बुक होत असे. (mumbai news busted by top model and actress charges 2 lakh rupees for 2 hours )
दोन तासाचे घ्यायच्या दोन लाख रुपये
मुंबई गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी ईशा खानला बनावट ग्राहक म्हणून संपर्क केला. ईशा खानला सांगितले की, तिला आणि तिच्या एका मित्राला टॉप मॉडेल हवे आहेत. यानंतर ईशा खानने व्हॉट्सअॅपवर अनेक फोटो पाठवले. गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी दोन मुलींचे फोटो निवडले. त्यापैकी एकीने अनेक जाहिरातींमध्ये काम केले आहे आणि दुसरीने अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे.
गुन्हे शाखेने असा सापळा रचला, समोर आला सेक्स रॅकेटचा खेळ
ईशा खानने प्रति मुलगी दोन तासांसाठी दोन लाख रुपयांमध्ये डिल केलं. गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी या डिलला होकार दिला. जुहू हॉटेल देखील बुक केले होते. गुरुवारी रात्री महिला दलाल आणि मॉडेल आणि अभिनेत्री हॉटेलच्या बाहेर पोहोचताच. गुन्हे शाखेच्या पथकाने त्यांना ताब्यात घेतलं. (mumbai news high profile sex racket busted by crime branch top model and actress charges 2 lakh rupees for 2 hours )
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times