यामुळे कोकणातील विद्यार्थ्यांचं नुकसान झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या दोन अभ्यास क्रमाकांच्या पीएचडी साठी सहा जागा या विद्यापीठात होत्या. मनुष्यबळाचे कारण देत हा अभ्यासक्रम बंद करण्यात आलाय. त्यामुळे आता कोकणातील विद्यार्थ्यांना या विषयातील पीएचडी साठी बाहेर जावे लागते ते आर्थिक दृष्ट्या परवडणारे नाही. असे असतानाही कोकण कृषी विद्यापीठ मात्र यावर कोणतीही हालचाल हा अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी कृषी विद्यापीठ करत नाही असा आरोप होतोय.
कोकण कृषी विद्यापीठ मनुष्यबळाचे कारण देत आणखी किती पीचडी अभ्यासक्रम बंद करणार हा प्रश्न आहे.शासनाने पदभरतीस मान्यता दिल्यास ही पदे भरता येतील व असे कोर्स बंद करण्याची वेळ येणार नाही अशी कृषी विद्यापीठाची भूमिका आहे. या सगळया विषयात कोकणातील लोकप्रतिनिधी व विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य व विद्यापीठ प्रशासनाने शासनाकडे पाठपुरावा करणे आवश्यक आहे अन्यथा कोकणातील विद्यार्थी पीएचडीच्या कोर्स पासून वंचित राहतील व त्यांचे शैक्षणिक नुकसान होईल हे स्पष्ट आहे.
Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News – Maharashtra Times