जिल्हा पोलीस क्रीडांगणावर नगरपरिषदेकरीता आलेल्या फायरब्रिगेड गाड्या, आरोग्य विभागाला मुख्यमंत्री निधीमधून मिळलेल्या ९ रुग्णवाहिका, २४ लसीकरणासाठी आलेल्या रूग्णवाहिका तसेच पोलीस विभागाला जिल्हा नियोजन मधून दिलेल्या ९ वाहनांचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार, आमदार डॉ. देवराव होळी, जिल्हाधिकारी दीपक सिंगला, पोलीस उप महानिरिक्षक संदिप पाटिल, मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशिर्वाद, पोलीस अधीक्षक अंकित गोयल, नगराध्यक्षा योगिता पिपरे, जिप उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, माजी आमदार नामदेवराव उसेंडी, जिप सदस्य ॲड.रामभाऊ मेश्राम उपस्थित होते.
क्लिक करा आणि वाचा-
या कार्यक्रमाला उपस्थितांना उद्देशून पालकमंत्र्यांनी मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले जिल्हयात विकास कामांना गती देत असताना सर्वांनी सहकार्याची भूमिका ठेवा. राज्य शासनाबरोबर केंद्राकडूनही चांगल्या प्रकारे जिल्ह्यासाठी मदत मिळत आहे. नुकतेच ५०० कोटींचे रस्ते व पुलांच्या कामाला मंजूरी मिळाली आहे. जिल्हयातील प्रतिक्षेत असलेले मेडीकल कॉलेजही लवकरच अंतिम टप्प्यावर आणू असे ते यावेळी म्हणाले. या कार्यक्रमात उपस्थित सर्वांनी आपाआपले मनोगत व्यक्त केले. यावेळी अजय कंकडालवार यांनी जिल्ह्यातील ब्रीज कम बंधारे यातून दळणवळणाला चालना मिळाल्याचे सांगितले. यावेळी पोलिस क्रीडांगणावर नव्याने बांधण्यात आलेल्या किल्ला भिंतीचे अनावरण करण्यात आले.
क्लिक करा आणि वाचा-
‘ बदल रही है’- विजय वडेट्टीवार
गडचिरोली जिल्ह्यातील विकास कामे, नवीन कामांचे शुभारंभ पाहून मला असे वाटतेय की ‘अब गडचिरोली बदल रही है’ असे उद्गार आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी काढले. सद्या पालकमंत्री व आम्ही जिल्ह्यासाठी विकासाचं मोठं पाऊल टाकत आहोत. या आलेल्या वाहनांमुळे दुर्गम भागातील आरोग्य विषयक गरजा पुर्ण होतील असे ते यावेळी म्हणाले. येत्या काळात गडचिरोलीसह चंद्रपूरसाठी नव्या पध्दतीचे आधुनिक आपत्ती मध्ये मदत करणारे वाहन पुरविणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times