लखनऊ: उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री, राजस्थानचे माजी राज्यपाल आणि भाजपचे ज्येष्ठ नेते यांचे येथील रुग्णालयात आज निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते. ४ जुलै रोजी कल्याण सिंह यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती तेव्हापासून चिंताजनकच होती. त्यातच आज त्यांची प्राणज्योत मालवली. कल्याण सिंह यांच्या निधनाने भाजपने राम मंदिर आंदोलनातील एक प्रमुख नेता गमावला आहे. ( )
कल्याण सिंह यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. उत्तर प्रदेशच्या जडणघडणीत कल्याण सिंह यांचे खूप मोठे योगदान राहिले आहे. त्यांच्या निधनाने एक कुशल नेता, कर्तव्यकठोर प्रशासक आणि तळागाळातील जनतेशी नाळ जुळलेला नेता आम्ही गमावला आहे, अशा भावना पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केल्या.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times