मुंबई: राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं भाजपकडून आज सभागृहात सावरकरांच्या अभिवादनाचा ठराव मांडला जाण्याची शक्यता आहे. सावरकरांबद्दल महाविकास आघाडीतील पक्षांच्या भूमिका परस्परविरोधी असल्यानं त्यावरून गदारोळ होण्याची शक्यता आहे. याशिवाय, मराठी सक्तीचं विधेयकही सरकारकडून आणलं जाण्याची शक्यता आहे.

लाइव्ह अपडेट्स:

>> सावरकरांच्या गौरव प्रस्तावावर शिवसेना काय भूमिका घेणार?, सर्वांनाच उत्सुकता

>> आज सावरकरांची पुण्यतिथी आहे. सावरकरांनी देशासाठी केलेल्या बलिदानाचं स्मरण करण्याचा आजचा दिवस आहे. यात कोणाचीही कोंडी करण्याचा प्रश्न नाही – राम कदम

>> स्वातंत्र्यवीर सावरकरांचा गौरवपर प्रस्ताव भाजपकडून विधानसभा अध्यक्षांना सादर

>> महिलांवरील अत्याचारांच्या विषयावर सरकार गंभीर नाही – दरेकर

>> गुन्हेगारांकडं अॅसिड, पेट्रोल कुठून येतं?; विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांचा सवाल

>> महिला सुरक्षेच्या मुद्द्यावर विधान परिषदेत चर्चा

>> भाजप सरकारला कोंडीत पकडून शकत नाही. एवढी ताकदच त्यांच्यात नाही – बच्चू कडू

>> महापुरुषांचा गौरव करण्याबद्दल काही नाही. पण भाजपनं त्यावरून राजकारण करणं टाळावं – बच्चू कडू

>> उद्या होत असलेल्या मराठी भाषा दिनाच्या पार्श्वभूमीवर मराठी सक्तीचं विधेयक येणार?

>> भाजपकडून स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अभिवादनाचा ठराव मांडला जाण्याची शक्यता

>> राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज तिसरा दिवस

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here