राज्यात आज ४ हजार १४१ नवीन रुग्णांचं निदान झालं असून १४५ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.११ टक्के एवढा आहे. तसंच आज ४ हजार ७८० रुग्ण बरे होऊन घरी परतले असून राज्यात आजपर्यंत एकूण ६२,३१,९९९ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण (Recovery Rate) ९७ टक्के एवढं झालं आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५,२२,९२,१३१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६४,२४,६५१ (१२.२९ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३,१२,१५१ व्यक्ती होम क्वारन्टाइनमध्ये आहेत, तर २,५२६ व्यक्ती संस्थात्मक क्वारन्टाइनमध्ये आहेत.
कोणत्या जिल्ह्यात किती अॅक्टिव्ह रुग्ण?
राज्यातील बहुतांश भागातील करोना प्रादुर्भाव सध्या आटोक्यात आला आहे. मात्र काही ठराविक जिल्ह्यांमध्ये करोना प्रादुर्भाव अजूनही कायम असल्याचं चित्र आहे. सध्या पुणे जिल्ह्यात १२ हजार ०६९, ठाणे जिल्ह्यात ६ हजार ९८० आणि साताऱ्यात ६ हजार ८७४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्याखालोखाल सांगलीत ४५५७, सोलापुरात ४३८२ आणि अहमदनगरमध्ये ४९६३ अॅक्टिव्ह रुग्णसंख्या असल्याचं पाहायला मिळत आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times