नीती आयोगाने गेल्या वर्षी सप्टेंबरपूर्वी २०२० मधेय दुसऱ्या लाटेआधी अंदाज व्यक्त केला होता. दुसऱ्या लाटेत गंभीर आणि मध्यम लक्षणं असणाऱ्या २० टक्के रुग्णांना हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागू शकतं, असं त्या अंदाजात म्हटलं होता. आता दुसऱ्या लाटेच्या तुलनेत नीती आयोगाने तिसऱ्या लाटेचा व्यक्त केलेला अंदाज हा आपल्याला सतर्क करणार आहे.
नीती आयोगाचे सदस्य (आरोग्य) डॉ. व्ही. के. पॉल यांनी गेल्याच महिन्यात केंद्र सरकारला करोना संसर्गाचा सामना करण्यासाठी काही सूचना केल्या होत्या. तिसऱ्या लाटेत १०० पैकी १०० रुग्णांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची वेळ येऊ शकते, असं पॉल म्हणाले होते.
करोनाच्या दुसऱ्या लाटेपेक्षा तिसऱ्या लाटेत परिस्थिती आणखी गंभीर आणि बिटक होऊ शकते. यामुळे आपल्याला सज्ज रहावं लागेल. तिसऱ्या लाटेत रोज ४ ते ५ लाख नवीन रुग्ण आढळून येऊ शकतात, असा अंदाज आहे. यामुळे आपल्याला पुढच्या महिन्यापर्यंत २ लाख आयसीयू बेड तयार ठेवावे लागतील. यात व्हेंटिलेटरसह १.२ लाख आयसीयू बेड, ७ लाख बिना आयसीयूचे बेड ( यात ५ लाख ऑक्सिजन असलेले बेड) आणि १० लाख कोविड आयसोलेशन बेड हवे आहेत, असं नीती आयोगाने म्हटलं आहे.
नीती आयोगाने हा अंदाज करोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर देशातील वेगवेगळ्या हॉस्पिटल्समध्ये दाखल रुग्णांच्या पॅटर्नच्या आधारावर व्यक्त केला आहे. दुसऱ्या लाटेत १० राज्यांमध्ये अधिकाधिक २१.४ टक्के रुग्णांची नोंद झाली होती. यातील २.२ टक्के नागरिकांना आयसीयूमध्ये दाखल करण्याची वेळ आली होती.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times