वॉशिंग्टनः अफगाणिस्तानातून सुटका झालेल्या एका महिलेने अमेरिकेच्या सी -17 ग्लोबमास्टर या विमानामध्ये एका बाळाला जन्म दिला आहे. अफगाणिस्तानातून वाचवण्यात आलेल्या इतर नागरिकांसोबत या महिलेला अमेरिकेत नेण्यात येत होतं. अमेरिकेच्या आखातील देशातील एअरबेसवरून जाताना महिलेला विमानात प्रसूती वेदना सुरू झाल्या. हवेचा दाब वाढल्याने वैमानिकाने विमान उतरवण्याचा निर्णय घेतला. यानंतर, अमेरिकेच्या हवाई दलाच्या जवानांनी जर्मनीतील रामस्टीन विमानतळावर विमानाचे इमर्जन्सी लँडिंग केले.

लँडिंग होताच वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी विमानातच महिलेची प्रसूती केली. अमेरिकेच्या हवाई दलाने यानंत ट्विट केलं. आई आणि बाळ दोघेही स्वस्थ आहेत. त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे, अशी माहिती त्या ट्वीटमधून देण्यात आली. अफगाणिस्तानमधील काबुल आंतरराष्ट्रीय विमानतळावर अमेरिकेच्या सैन्याचा ताबा आहे. हवाई दलाने आतापर्यंत १७ हजारांहून अधिक नागरिकांची सुटका केली आहे, असं अमेरिकेच्या प्रशासनाने शनिवारी सांगितलं.

काबुल विमानतळावरील २१ ऑगस्टला एक फोटो समोर आला होता. या फोटोने सर्वांची मनं जिंकली. तुर्कीचे सैनिक इथे तैनात होते. तिथे त्यांना एक माणूस २ महिन्यांच्या मुलीला घेऊन भटकताना दिसला. मुलीला खूप भूक लागली होती. त्या व्यक्तीचं नाव फरिश्ता रहमानी असं होतं. तालिबानपासून वाचण्यात त्याची पत्नी अली मुसा रहमानी मागे राहिली आणि तो मुलीसह काबुल विमानतळावर पोहोचला होता.

तुर्की सैनिक मुलीला आणि तिच्या वडिलांसह सुरक्षित ठिकाणी पोहोचले. मुलीला आंघोळ घातल्यानंतर त्यांनी तिला दूध दिले. यानंतर त्यांनी मुलीला वडिलांकडे दिलं. तुर्कीचे सैनिक सतत काबुल विमानतळावर नागरिकांना मदत करत आहेत. ते अन्न आणि पाणी पुरवत आहेत.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here