वाचा-
शास्त्रींनी जावेद मियांदाद यांच्या मागे बूट घालून धावण्याचा किस्सा बऱ्याच जणांना माहित आहे. आता त्यांनी विराट कोहलीबद्दलही पुस्तकातील थोडी माहिती उघड केली आहे. रवी शास्त्री त्यांच्या लाडक्या आणि सध्याचा भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीचा उल्लेख आपल्या पुस्तकात करायला विसरले नाहीत.
वाचा-
कोहली आहे तापट
शास्त्रींच्या मते, ‘विराट कोहलीचा स्वभाव त्याला इतर क्रिकेटपटूंपेक्षा वेगळा ठरवतो. गेल्या चार दशकांत मी कोणत्याही भारतीय खेळाडूला इतकी मेहनत करताना पाहिलेलं नाही. त्याच्या प्रशिक्षण आणि आहारामुळेही संपूर्ण ड्रेसिंग रूमचं वातावरण बदललं आहे, पण हा फक्त एक भाग झाला. विराट एवढ्याच ताकदीनं नेटमध्येही प्रॅक्टीस करतो. त्याला सतत सुधारणा करावी वाटते.
वाचा-
सर्वोत्तम होण्यासाठी लढाई
‘नेटमध्ये तासनतास वेळ घालवतो. संघ किंवा गोलंदाजाच्या विरोधात कोणती भूमिका घ्यायची, बॅकलिफ्टसारख्या छोट्या चुका सुधारण्यासाठी आपली सर्व शक्ती पणाला लावतो. त्याला केवळ संघात सर्वोत्कृष्ट बनण्याची इच्छा नाही, तर जगातील सर्वोत्तम लोकांमध्ये सर्वोत्कृष्ट व्हायचं आहे. त्याला आता लढण्याची सवय झाली आहे. कोहलीसाठी आणि आता संपूर्ण टीमसाठी ही चांगली गोष्ट आहे. दुसऱ्या शब्दांत सांगायचं झालं तर तो अस्वस्थ आहे.
वाचा-
अपयशी होण्याची भीती नाही
त्याला नेहमीच नवं काहीतरी करायचं असतं, नेहमी नवीन गोष्टी तो शोधत असतो. नवनवीन प्रयोग करतो, काहीत पास होतो, काहीत नापास होतो. अपयश एक उत्तम धडा म्हणून घेतो. तो नेहमीच उत्साही असतो, मैदानात काहीजण त्याला क्रिकेट संस्कृतीच्या विरोधात मानतात, पण तोच त्याचा नैसर्गिक स्वभाव आहे. हीच गोष्ट त्याला मैदानात विरोधकांसमोर एक प्रबळ योद्धा बनवते.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times