मुंबई: ‘देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत व अन्य काही गोष्टींमध्ये सावरकरांचे काहीएक योगदान आहेच. ते कुणालाही नाकारता येणार नाही. त्यामुळं त्यावरून गैरसमज निर्माण करण्याचं कारण नाही,’ असं परखड मत राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी आज व्यक्त केलं.

विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुण्यतिथीचं औचित्य साधून भाजपनं आज विधानसभा अध्यक्षांकडं सावरकरांचा गौरवपर प्रस्ताव दिला आहे. महाविकास आघाडी सरकारमधील पक्षांमध्ये सावरकारांविषयी मतभेद आहेत. त्यामुळं गौरवपर प्रस्तावावरून त्यांना कोंडीत पकडण्याची रणनीती भाजपनं आखल्याचं समजतं. या पार्श्वभूमीवर विधानसभेच्या कामकाजासाठी जाताना अजित पवार यांनी माध्यमांकडं आपली भूमिका स्पष्ट केली. ‘चांगल्या व्यक्तीच्या संदर्भात एखादी चर्चा येणार असेल तर कुणाला आक्षेप असण्याची हरकत नाही. गेल्या ३० वर्षांत मी अनेकदा अशा चर्चांमध्ये भाग घेतला आहे. सावरकरांचं योगदान कुणालाही नाकारता येणार नाही. हयात नसलेल्या व्यक्तींबद्दल अनावश्यक विधानं करून गैरसमज पसरवण्याचं काही कारण नाही,’ असं अजित पवार म्हणाले.

वाचा:

‘विरोधकांनी काय करायचं हा त्यांचा प्रश्न आहे. पण सत्ताधारी म्हणून सभागृहाचं कामकाज सुरळीत पार पडावं असा आमचा प्रयत्न असतो. कारण, अनेक महत्त्वाची विधेयकं मंजूर करून घ्यावी लागतात. शेवटी सभागृह हे नियमाप्रमाणं चालतं. तिथं कामकाज सल्लागार समिती असते. अध्यक्ष असतात. एखादा विषय ऐनवेळी चर्चेला घ्यायचा निर्णय त्यांचा असतो. त्यानुसार तो घेतला जातो,’ असं अजित पवार म्हणाले.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here