नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याचा प्रस्ताव राज्य सरकारनं ठेवला आहे. तर, लोकनेते दि. बा. पाटील यांचं नाव देण्याची मागणी स्थानिक आगरी व कोळी समाजाकडून केली जात आहे. त्यासाठी मागील महिन्यात आंदोलनही करण्यात आलं होतं. प्रत्येक व्यासपीठावर ही मागणी उपस्थित केली जात आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागलेले ठाणे जिल्ह्यातील खासदार कपिल पाटील यांनी देखील स्थानिकांच्या मागणीला पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळं नामकरणाचा पेच वाढला आहे. दुसरीकडं, सध्या मुंबईतील मासळी बाजार इतरत्र हलवले जात आहेत. क्रॉफर्ड मार्केट येथील छत्रपती शिवाजी महाराज मच्छी मार्केटही ऐरोली इथं हलवण्यात आलं आहे. त्याचा मोठा परिणाम कोळी बांधवांच्या व्यवसायावर झाला आहे. त्यानंतर दादर येथील मच्छी मार्केट तोडण्यात आलं आहे. दादरमधील मच्छीमार व्यावसायिकांचा ऐरोली इथं जाण्यास विरोध आहे.
वाचा:
मनसेचे सरचिटणीस यांनी या दोन्ही गोष्टींचा संबंध जोडला आहे. त्यांनी एक ट्वीट केलं आहे. ‘खरे तर आगरी, कोळी बांधव हे मुंबईचे मूळ रहिवाशी. त्यांनाच सध्या विस्थापित करण्याचा प्रयत्न चालू आहे. अनेक ठिकाणचे मासळी बाजार बंद केले जात आहेत. कोळीवाडे उद्ध्वस्त केले जात आहेत. विमानतळाला दि. बा. पाटील साहेबांचं नाव देण्याचा आग्रह हे तर यामागचं कारण नाही ना,’ असा सवाल देशपांडे यांनी केला आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times