गंभीर जखमी रुग्णांना जालना येथील रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे तर उर्वरित जखमी प्रवाशांवर देऊळगाव राजा येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सदर बस जालनावरून देऊळगाव राजाकडे येत होती तर ट्रक हा जालनाकडे जात असताना हा अपघात घडला आहे.
ट्रक भरधाव वेगाने जालनाकडे जात असताना एसटी बसला क्रॉस करत एक बाजूने पूर्णपणे फाडत नेले. त्यामुळे ड्रायव्हर साईडला बसलेले सर्व प्रवाशी गंभीर जखमी झाले असल्याची माहिती आहे. स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळावर धाव घेऊन या सर्व प्रवाशांना बसच्या बाहेर काढून त्यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यासाठी प्रयत्न केले आहेत.
गेल्या दोन दिवसापूर्वी जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यात ट्रक पलटी झाल्याने १३ मजुरांचा मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच परत हा एक मोठा अपघात म्हणावा लागेल.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times