दापोली : यांचे स्वीय सहाय्यक आणि शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या बंगल्यावर हातोडा चालवण्यात आला आहे. या कारवाईनंतर आता भाजप नेते आणि माजी खासदार ( BJP) यांनी कॅबिनेट मंत्री अनिल परब यांच्या रिसॉर्टवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘मिलिंद नार्वेकरांचा बंगला पाडला, आता अनिल परबांचे रिसॉर्ट केव्हा पाडणार? असा सवाल किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्र्यांना केला आहे.

किरीट सोमय्या यांनी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात मुरुड येथे जाऊन मिलिंद नार्वेकर यांच्या पाडलेल्या बंगल्याची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

मिलिंद नार्वेकर यांच्याशी संबंधित अनधिकृत बंगला प्रकरण गेले काही दिवस गाजत होतं. किरीट सोमय्या यांनी याबाबत प्रशासन तसंच केंद्राकडेही तक्रार केली होती. त्यानंतर सोमय्या यांनी गेल्या आठवड्यात या परिसरात येऊन प्रशसनाला इशारा दिला होता. आठवडाभरात हे अनधिकृत बांधकाम तोडलं नाही तर आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला होता. दरम्यान मिलिंद नार्वेकर यांनी हा बंगला तोडण्याचं काम सुरू केलं आहे. त्यानंतर आज सोमय्या यांनी या ठिकाणी येऊन पाहणी केली. जवळपास पंधरा मिनिटे ते मिलिंद नार्वेकर यांच्या घराबाहेर होते.

यावेळी बोलताना सोमय्या म्हणाले की, प्रशासनाला मिलिंद नार्वेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करायचा नव्हता, म्हणून प्रशासनाने मिलिंद नार्वेकर यांना स्वतः बंगला पाडलायला सांगितला, असा आरोप सोमय्या यांनी यावेळी केला.

वैभव नाईक यांच्या आरोपांना उत्तर
शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या बंगल्याबाबत केलेल्या वक्तव्याचाही किरीट सोमय्या यांनी समाचार घेतला. वैभव नाईक आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामध्ये हिंमत असेल तर त्यांना हरित लवादामध्ये खटला दाखल करावा, असं आव्हान त्यांनी यावेळी दिलं.

दरम्यान, मिलिंद नार्वेकर यांच्या बंगल्याची पाहणी केल्यानंतर किरीट सोमय्या यांनी साई रिसॉर्टची पाहणी केली. हे रिसॉर्ट पालकमंत्री अनिल परब यांचं अनधिकृत रिसॉर्ट असून मिलिंद नार्वेकर यांचा बंगला गेला, आता पालकमंत्री अनिल परब यांच्या रिसॉर्टचा नंबर असल्याचं सोमय्या यावेळी म्हणाले.

Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News – Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here