आज राज्यात झालेल्या १०५ रुग्णांच्या मृत्यूंनंतरही राज्याचा मृत्यूदर मात्र २.११ टक्क्यांवरच आहे. याबरोबर राज्यात आतापर्यंत एकूण ६२ लाख ३८ हजार ७९४ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०५ टक्के इतके झाले आहे.
क्लिक करा आणि वाचा-
राज्यातील सक्रिय रुग्णा ५० हजारांच्या खाली
राज्यातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ४९ हजार ९२४ वर आली आहे. राज्यातील सक्रिय रुग्णांचा जिल्हानिहाय विचार करता पुणे जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. पुणे जिल्ह्यात हा आकडा ११ हजार ७४६ वर खाली आला आहे. ठाणे जिल्ह्यात ६ हजार ९८२ सक्रिय रुग्ण आहेत. त्या खालोखाल साताऱ्यात ही संख्या ५ हजार ८०० इतकी आहे. तर, सांगलीत एकूण ४ हजार ४०४ इतके रुग्ण उपचार घेत आहेत. अहमदनगरमध्ये एकूण ४ हजार ६५४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर सोलापुरात ४ हजार १७८ इतके रुग्ण आहेत.
क्लिक करा आणि वाचा-
मुंबईत उपचार घेत आहेत ३०२९ रुग्ण
मुंबई महापालिका हद्दीत सक्रिय रुग्णांच्या संख्येत घट होत ती ३ हजार ०२९ वर आली आहे. तर, रत्नागिरीत १ हजार १२१, सिंधुदुर्गात १ हजार ०७५, बीडमध्ये ९३१, नाशिकमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या ८२२ इतकी आहे. रायगडमध्ये ७४० इतके रुग्ण आहेत.
नंदुरबारमध्ये एकही रुग्ण नाही
या बरोबरच, औरंगाबादमध्ये ६३३, नांदेडमध्ये ही संख्या ३५ इतकी आहे. जळगावमध्ये ४४, नागपूर जिल्ह्यात ही संख्या १०९ इतकी झाली आहे. अमरावतीत ही संख्या ८९ वर खाली आली आहे. तर यवतमाळमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या १३ इतकी आहे. तसेच, धुळ्यात ६ तर भंडाऱ्यात रुग्ण आहेत. गोंदिया जिल्ह्यात ४ सक्रिय रुग्ण आहे. तर नंदुरबारमध्ये आजही एकही रुग्ण नाही.
क्लिक करा आणि वाचा-
३,०२,८८८ व्यक्ती होम क्वारंटाइन
आतापर्यंत तपासण्यात आलेल्या ५ कोटी २४ लाख ४५ हजार ६८९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६४ लाख २८ हजार २९४ (१२.२६ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३ लाख ०२ हजार ८८८ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत. तर, २ हजार ४८७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times