म. टा. प्रतिनिधी, पुणे

अपहरणाच्या गुन्ह्यात चंदननगर परिसरातून हैदराबाद पोलिसांच्या ताब्यातून पसार झालेल्या आरोपीचा मृतदेह सोमवारी दुपारी खराडी भागात सापडला. त्याने आत्महत्या केल्याचा संशय चंदननगर पोलिसांनी व्यक्त केला आहे.

जुबेर हाफिज शेख (वय २०, रा. मरकुंडा, जि. बिदर, कर्नाटक ) असे मृतावस्थेत सापडलेल्या आरोपीचे नाव आहे. शेख याच्या विरोधात अल्पवयीन मुलीचे केल्याप्रकरणी हैद्राबाद परिसरातील सरूरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तो चंदननगर भागात नातेवाईकांकडे वास्तव्यास असल्याची माहिती मिळाल्यानंतर २० ऑगस्ट रोजी हैद्राबादमधील सरूनगर पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक बी. कृष्णय्या रामलू आणि पथकाने त्याला चंदननगर भागातून ताब्यात घेतले. शेख आणि अल्पवयीन मुलीला मोटारीतून घेऊन हैद्राबादला घेऊन पोलिसांचे पथक निघाले होते. वाटेत एका हॉटेलजवळ पोलिसांनी मोटर थांबविली. त्या वेळी तो पोलिसांच्या ताब्यातून पसार झाला.

क्लिक करा आणि वाचा-
या बाबतची माहिती चंदननगर पोलिसांना देण्यात आल्यानंतर त्याचा शोध घेण्यात आला. खराडी भागातील आयटी पार्कजवळ असलेल्या एका बंधाऱ्यातील पाण्यात एका तरुणाचा मृतावस्थेत सापडल्याची माहिती पोलिसांना मिळाली. चंदननगर पोलिसांनी अग्निशमन दलाच्या जवानांच्या मदतीने मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. चौकशीत मृतदेह शेख याचा असल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी याबाबतची माहिती हैद्राबाद पोलिसांना दिली आहे. शेखने आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here