चंद्रपूर येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. कोरोना नियम पाळून दहीहंडीला परवानगी न दिल्यास आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला आहे. आज आणि उद्या असे दोन दिवस सोलापूर दौऱ्यावर आलेल्या आशीष शेलार यांचे भाजपच्यावतीने छत्रपती संभाजी महाराज चौकात जल्लोषात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत स्वागत करण्यात आले.
क्लिक करा आणि वाचा-
राज्यातील नेत्यांची मुले सुरक्षित, जनता मात्र असुरक्षित: शेलार
यावेळी महापौर श्रीकांचना यन्नम, शहराध्यक्ष विक्रम देशमुख ,सभागृह नेते शिवानंद पाटील, बिजू प्रधाने आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चंद्रपुरात वृद्धांना मारहाणीच्या घटनेबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना शेलार म्हणाले, सरकारचा पोलिसांवर वचक नसल्यामुळेच लोक सुरक्षित नाहीत. नेत्यांच्या मुलांची सुरक्षा वाढली असून जनतेची सुरक्षा कमी केली आहे. कायदा व सुव्यवस्थेकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे. गोविंदा उत्सवाबाबत ते म्हणाले, मुख्यमंत्री आज झूमद्वारे बैठक घेत आहेत. ज्यांचे दोन लस डोस झाले, त्यांना जास्त उंच नाही व शहरभर नसलेले दहीहंडीचे कार्यक्रम घेण्यास परवानगी द्यावी. दहीकाल्यास सरकारने परवानगी न दिल्यास आंदोलन करू असेही ते म्हणाले. उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंग यांच्या संदर्भातील प्रश्नाला उत्तर न देता त्यांनी केंद्रीय प्रवक्त्यांनी कडेबोट दाखवले.
क्लिक करा आणि वाचा-
‘दहीहंडीवर पूर्णपणे बंदी नसावी’
सरकारने दहीहंडीवर पूर्णपणे बंदी घालू नये, असे शेलार यांनी म्हटले आहे. ज्यांनी लसीचे दोन डोस घेतले आहेत, अशा गोविंदांना कमी उंचीच्या दहिदंडीला शासनाने परवानगी द्यावी. कोरोनाची परिस्थितीची कल्पना सर्वांना असून त्याबद्दल खबरदारी व काळजी घेण्यास जी उत्सव मंडळे तयार आहेत. त्यांना गर्दी न करता आपापल्या विभागात पारंपरिक पध्दतीने कमी उंचीच्या दहिदंडीला परवानगी शासनाने द्यावी, अशी मागणी शेलार यांनी केली. उत्सवावर पूर्णपणे बंदी असू नये. उत्सवांची परंपरा कायम राहिल अशी भूमिका शासनाने घ्यावी, असे आमदार आशीष शेलार यांनी म्हटले आहे.
क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times