खेड : कोकणातील असलेल्या नैसर्गिक साधन संपत्तीचा उपयोग छोटे उद्योग सुरू करण्यासाठी करून घेणे आवश्यक आहे असे प्रतिपादन नारायण राणे यांनी रत्नागिरी जिल्ह्यात खेड तालुक्यात नातूनगर येथे बोलताना केले.

जनआशीर्वाद यात्रे दरम्यान सोमवारी रात्री उशीरा झालेल्या सभेत ते बोलत होते. यावेळी ना.राणे यांचे जल्लोषी वातावरणात जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजपचे प्रदेश सचिव, माजी खासदार नीलेश राणे, भाजप जिल्हाध्यक्ष डॉ. विनय नातू, कोकण विकास समिती अध्यक्ष जयवंत दरेकर, केदार साठे, महिला मोर्चा अध्यक्ष स्मिता जावकर दापोली, मंडणगड व खेड येथील भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यक्रमात दापोलीचे माजी आमदार सूर्यकांत दळवी हेहि खास विशेष उपस्थित होते.

ते पुढे म्हणाले की, कोकणातही असे उद्योग उभे रहावेत येथील महिला व तरुणांमधून उद्योजक उभे रहावेत. महाराष्ट्रातील मराठी तरुणांनी, महिलांनी उद्योगासाठी पुढे येणे आवश्यक आहे. गेल्या दीड महिन्याच्या काळात दिल्लीत अनेक उद्योजक भेटले पण त्यात कोकणातील कोणीही नव्हते अशी खंत राणे यांनी खेड तालुक्यात नातूनगर येथील सभेत बोलताना व्यक्त केली.

मारवाडी समाज एक टक्का असेल पण अर्थ व्यवस्थेतील वाटा २४ टक्के आहे समजून घ्या मग आपण कुठे कमी पडतोय याचा विचार करणे आवश्यक आहे. आसाम, केरळ, गुजरात, उर्वरीत महाराष्ट्रातून आपल्याला अनेक उद्योजक भेटले नाविन्यपूर्ण उत्पादन, उद्योग उभे राहिले आहेत. लघू व मध्यम उद्योग क्षेत्रातील त्यांनी अनेक उदाहरणे देऊन आपण कोकणात काय करु शकतो याविषयी मार्गदर्शन करून विविध कर्ज योजना, मिळणारे अनुदान याविषयी माहिती दिली.

नारळाच्या काथ्यापासून सुंभ बनवले जाते. मात्र त्या वेळी निर्माण होत असलेल्या भुशातुन प्लायवुड बनवले जाते असा कारखाना आपल्या कोकणात उभा रहावा यासाठी आपले प्रयत्न सुरु आहेत अशी माहिती भाजपचे नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिली. यावेळी पर्यटन व्यवसायीक, चिरेखाण व्यवसायिक, मच्छीमार बांधव आदींनी आपापल्या व्यवसाय असलेल्या विविध समस्या व मागण्यांचे निवेदन राणे यांना दिले.

Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News – Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here