रत्नागिरीः ‘देशाला स्वातंत्र्य मिळून किती वर्षे झाली हे जर संवैधानिक पदावर असलेल्या व्यक्तीला माहिती नसेल तर हा देशाचा अपमान आहे. त्यामुळं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (Cm Uddhav Thackeray) देशाचा अपमान केला आहे. त्यांनी लवकरात लवकर माफी मागावी,’ अशी मागणी भाजप आमदार (Nitesh Rane) यांनी केली आहे.

यांच्या वक्तव्याचे तीव्र पडसाद राज्यभरात उमटले आहेत. शिवसैनिकांनी राज्यातील विविध ठिकाणी भाजप व राणेंविरोधात आंदोलनं केली आहेत. नारायण राणे यांची पुत्र व भाजप आमदार नितेश राणे यांनी यावर प्रतिक्रिया देत थेट मुख्यमंत्र्यांवरच निशाणा साधला आहे.

‘हे सरकार देशद्रोही आहे का? देशाचा अपमान करणाऱ्या व्यक्तीचे संरक्षण करणार का? देशाच्या स्वातंत्र्याला किती वर्ष झाली हे जर संवैधानिक पदावर असलेल्या व्यक्तीला माहिती नसेल तर हा देशाचा अपमान आहे. त्यामुळं मुख्यमंत्री यांनीच देशाची माफी मागावी,’ असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे.

‘हे सरकार आधी हिंदू विरोधी आहे हे ऐकलं होतं, आता देशविरोधी हे सरकार आहे का?, उद्या देशाच्या बाजूने बोलणाऱ्या व्यक्तीलाच तुम्ही अटक करणार का?, ‘असा सवाल नितेश राणेंनी केला आहे.

दरम्यान, ‘नितेश राणेंनी एक ट्वीट करत राज्य सरकारवर आरोप केला आहे. मी माझ्या पद्धतीने रत्नागिरीच्या दिशेने जात होता. पोलीस मला आणि अन्य सामान्य नागरिकांना आपल्या कामासाठी रत्नागिरीला जायला देत नाही. यांच्याकडे कुठल्याही लेखी पद्धतीचा आदेश नाही. सामान्य नागरिकांना थांबवण्याचं काम पोलीस खात्यामार्फत केलं जात आहे. मला मारण्याची भाषा हे संबधित पोलीस करत आहेत याची दखल आपण घ्यावी,’ असं त्यांनी म्हटलं आहे.

नारायण राणे काय म्हणाले?
मुख्यमंत्र्यांना देशाचा अमृतमहोत्सव माहित नाही हा देशद्रोह आहे, असं सांगतानाच मी असतो तर… ऐवजी आत्ता कानफाड फोडेन असं म्हणालो असतो तर तो गुन्हा ठरला असता, असं स्पष्टीकरण नारायण राणेंनी दिलं आहे.

Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News – Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here