वाचा:
नारायण राणे यांनी पोलीस कारवाईवर आक्षेप घेतल्याने रत्नागिरीच्या पोलीस अधीक्षकांनी पालकमंत्री यांच्याशी संपर्क साधला व त्यांना माहिती दिली. राणे यांच्याकडून अटक वॉरंटची मागणी करण्यात आल्याचे अधीक्षकांनी सांगितले. त्यावर सत्र न्यायालयाने आणि उच्च न्यायालयाने जामीन नाकारल्याने आणखी वॉरंटची वाट पाहण्याची गरज नाही. तुम्ही पोलीस फोर्स वापरून अटकेची कारवाई करा, असे परब यांनी अधीक्षकांना सांगितले. त्यानंतर सूत्रे वेगाने हलली आणि राणे यांना अटक करण्यात आली. राणे यांना स्थानिक कोर्टात हजर केल्यानंतर नाशिक पोलिसांच्या ताब्यात दिले जाणार आहे.
वाचा:
दरम्यान, भाजपकडून सरकारवर गंभीर आरोप करण्यात आला. रत्नागिरी पोलीस नारायण राणे यांना अटक करण्यासाठी आले मात्र त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचा अटक वॉरंट नव्हता. पोलीस अधीक्षकांकडे आम्ही वॉरंटची मागणी केली. मात्र ते वॉरंट दाखवू शकले नाहीत, असा दावा भाजपचे यांनी केला. राणे यांना अटक करण्यासाठी पोलिसांवर दबाव टाकण्यात आला. पोलीस अधीक्षकच तसं बोलले आहेत. कोणत्याही वॉरंटशिवाय केंद्रीय मंत्र्यांवर अशी कारवाई करायला हे काय जंगलराज आहे का?, असा सवालही जठार यांनी केला. जठार माध्यमांशी बोलल्यानंतर काही वेळातच अटकेची कारवाई करण्यात आली. राणे यांची शुगर वाढली होती तसेच रक्तदाबही वाढला होता. त्यामुळे वैद्यकीय तपासणी करून नंतर त्यांना कोर्टाच्या दिशेने नेण्यात आले. यावेळी राणे समर्थकांनी तीव्र विरोध केला. मात्र, पोलिसांनी सर्वांना हटवत कारवाई केली.
दरम्यान, राणे यांच्यावरील कारवाईचे वार्तांकन करण्यासाठी आलेल्या माध्यम प्रतिनिधींवर राणे समर्थकांना दोन खुर्च्या फेकल्याने तणाव निर्माण झाला होता. त्यावर प्रमोद जठार यांनी सर्वांची माफी मागत वाद मिटवण्याचा प्रयत्न केला.
वाचा:
Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News – Maharashtra Times