महाड पोलिस राणे यांना थेट महाडमधील सत्र न्यायालयात नेणार की त्यापूर्वी कायदेशीर प्रक्रियेसाठी पोलिस ठाण्यात नेणार याबाबत स्पष्ट होऊ शकलेली नाही. तसेच राणे यांना आजच महाड न्यायालयात हजर करणार की उद्या सकाळी करणार हेही स्पष्ट झालेले नाही. जर राणे यांना आजच न्यायालयात हजर करण्यात आले तर त्यांना जामीन मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मात्र पोलिसांनी त्यांना आज न्यायालयात हजर केले नाहीत, तर राणे यांना आजची रात्र पोलिस कोठडीत काढावी लागू शकते.
क्लिक करा आणि वाचा-
रत्नागिरी पोलिसांनी नारायण राणे यांना आज दुपारी अडीच वाजता संगमनेरमध्ये अटक केली. तेथे नारायण राणे यांची तब्येत बिघडली. राणे यांचा रक्तदाब वाढला. तसेच त्यांच्या रक्तातील साखर देखील वाढल्याची माहिती भाजप नेते प्रमोद जठार यांनी दिली. त्यानंतर डॉक्टरांच्या एका पथकाने नारायण राणे यांची वैद्यकीय तपासणी केली. त्यात नारायण राणे यांचा रक्तदाब वाढला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. आपण त्यांची शुगट टेस्ट करू शकलो नसल्याचे डॉक्टर म्हणाले. मात्र, राणे यांचा रक्तदाब १६०-११० इतका वाढल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करून उपचार करण्याची आवश्यकता असलयाचे तपासणीसाठी आलेल्या डॉक्टकांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.
क्लिक करा आणि वाचा-
कायदेशीर कारवाई संबंधित पोलिस करतील- गृह राज्यमंत्री देसाई
दरम्यान, राणे यांना ज्या कलमानुसार अटक करण्यात आली त्यानुसार पुढील कायदेशीर कारवाई संबंधित जिल्ह्यातील पोलिस करतील, असे राज्याचे गृह राज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी म्हटले आहे. राणे यांना न्यायालयात हजर करावे लागणार असून त्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे ते पुढे म्हणाले.
क्लिक करा आणि वाचा-
Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News – Maharashtra Times