वाचा:
शिवसेनेचे खासदार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तसं पत्रच लिहिलं आहे. ‘महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या कानाखाली मारण्याची भाषा नारायण राणे यांनी केली आहे. त्यांची ही भाषा निषेधार्ह आहे. त्या भाषेचं कुणीही समर्थन करू शकत नाही. ज्या नेत्याला आपल्या मर्यादा ओळखता येत नाहीत. आपल्या पदाची प्रतिष्ठा राखता येत नाही, त्याला केंद्रीय मंत्रिमंडळात राहण्याचा अधिकार नाही. राणे यांनी वापरलेली भाषा हा केवळ महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा नव्हे तर देशाच्या पंतप्रधानांचाही अपमान आहे,’ असं राऊत यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे. ‘ही असली भाषा वापरून एक केंद्रीय मंत्री समाजाला कोणता संदेश देऊ पाहत आहेत? आपण तात्काळ राणेंचा राजीनामा घेऊन त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी राऊत यांनी केली आहे.
वाचा:
पंतप्रधान मोदी यांनी आपल्या पत्राची दखल घेतल्याचं विनायक राऊत यांनी म्हटलं आहे. या संदर्भात त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी संपर्क साधण्याची सूचना केली आहे, अशी माहिती विनायक राऊत यांनी माध्यमांना दिली. काही वेळातच पत्राला प्रतिसाद दिल्याबद्दल त्यांनी पंतप्रधानांचे आभारही मानले.
वाचा:
Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News – Maharashtra Times