वाचा:
नारायण राणे यांना अटकेनंतर स्टेशनमध्ये नेण्यात आले होते. तिथून त्यांना महाड येथे कोर्टात हजर करण्यासाठी नेण्यात येत असून राणे त्यांच्या कारमध्येच आहेत. कारमधून त्यांनी आज दुपारपासूनच्या घटनाक्रमावर टाइम्स नाऊ या वृत्तवाहिनीकडे प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी अटकेच्या कारवाईवर आश्चर्य व्यक्त करतानाच राणे यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना थेट शब्दांत इशारा दिला आहे.
वाचा:
‘मी आज दुपारी तीन सव्वातीन वाजण्याच्या सुमारास संगमेश्वरमधील गोळवली येथे गोळवलकर गुरुजी आश्रम येथे होतो. तिथे मी जेवण घेत असतानाच डीएसपी तिथे आले. तुम्हाला अटक करण्यासाठी आम्ही आलो आहोत, असे त्यांनी मला सांगितले. मी जेवत असतानाच मला जबरदस्ती अटक करण्यात आली. तिथून मला पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आले. पोलीस स्टेशनच्या आत माझ्याभोवती चारही बाजूला पोलीस ठेवण्यात आले होते. माझ्या जीवाला काहीतरी धोका आहे, असे मला तेव्हा वाटले. ज्या अधिकाऱ्याने माझ्यावर अटकेची कारवाई केली त्याच्या हेतुविषयी मला शंका वाटली. मला पोलीस स्टेशनमध्ये बसवून हा अधिकारी दुसरीकडे गेला. दोन तास मला पोलीस स्टेशनमध्ये बसवून ठेवण्यात आले. सगळ्या गोष्टी संशयास्पद होत्या. वरिष्ठ अधिकारी आल्यावर संगमेश्वरमधून मला महाडच्या दिशेने नेण्यात येत आहे. तिथे कोर्टात मला हजर केले जाणार आहे’, असा घटनाक्रम राणे यांनी सांगितला.
वाचा:
मुख्यमंत्र्यांबाबत आक्षेपार्ह विधान करून आपली चूक झाली आहे, असे वाटते का, असे विचारले असता मी तसं बोललेलो नाही, असे राणे म्हणाले. देशाचा स्वातंत्र्यदिन कितवा आहे, हे मुख्यमंत्र्याला माहीत नसणं ही बाब गंभीर आहे. निदान त्यांनी सेक्रेटरीला तरी आधी त्याबाबत विचारायला हवं होतं. हा प्रकार घडला तेव्हा मी तिथे असतो तर कानाखाली मारली असती, असे मी म्हणालो होतो. मारेन असे म्हणालेलो नाही, अशी सारवासारव राणे यांनी केली. केंद्रात मंत्री असताना एखाद्या नेत्याला कोठडीत जावं लागण्याची ही कदाचित पहिलीच वेळ असेल, असे निदर्शनास आणले असता, मी असा काहीच गुन्हा केलेला नाही. मी जे विधान केले आहे त्यावरून गुन्हा होऊच शकत नाही. मला जबरदस्तीने अटक करण्यात आली आहे, असे नमूद करत मुख्यमंत्री ठाकरे यांच्याबद्दल राणे यांनी एकेरी उल्लेख केला. ‘तो काही कायमचा मुख्यमंत्री राहणार नाही. आम्ही सुद्धा राजकारणात आहोत, इतकं लक्षात ठेवावं. त्याला जे काही करायचे ते करू दे. मला जे काही करायचे ते मी करेन’, असा इशाराही राणे यांनी दिला.
वाचा:
Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News – Maharashtra Times