केंद्रीय मंत्री रामदास आठवले नागपुरात रवी भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. राणे यांच्या अटकेवर आठवले यांनी कवितेतू आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते म्हणाले, ‘शिवसेनेचीच आहे नारायण राणेंची भाषा, आता महाविकास आघाडीच्या लोकांनी मारत बसा माशा, आता या सरकारकडून लोकांना अजिबात नाही आशा, म्हणून नारायण राणेंकडून अशी पाहायला मिळते भाषा.’ असे म्हणत या लोकांनी आता ताळमेळ ठेवून चांगले काम करावे असे आवाहनही आठवले यांनी केले आहे.
क्लिक करा आणि वाचा-
नारायण राणे यांना अटक करण्याचे राज्य सरकारचे कृत्य चुकीचे असल्याचे आठवले म्हणाले. त्यांना नोटीस वगैरे देणे ठीक आहे, मात्र शिवसेना देखील अशा प्रकारची भाषा वापरत आली आहे. म्हणून नारायण राणे यांनी वापरलेली भाषा ही शिवसेनेचीच भाषा आहे. मात्र, अशा प्रकारची कारवाई करणे ही चांगली गोष्ट नाही, असे रामदास आठवले म्हणाले. हे जाणूनबूजून पंगा घेण्याचे काम सरकारने केलेले आहे, म्हणूनच मला वाटते की ही गोष्ट चांगली नाही, असेही आठवले पुढे म्हणाले.
क्लिक करा आणि वाचा-
दरम्यान, आज दुपारी अडीचच्या सुमाराला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना रत्नागिरीतील संगमेश्वर येथे रत्नागिरी पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यावेळी नारायण राणे यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. या तपासणीनंतर राणे यांचा रक्तदाब वाढला असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता असल्याचे मत तपासणी करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले. मात्र, नंतर नारायण राणे यांना महाडला नेण्यात आले. महाडमध्ये राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून तेथील स्थानिक न्यायालयात त्यांना हजर केले जाणार आहे.
क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times