सिंधुदुर्ग: केंद्रीय मंत्री यांच्यावर अटकेची कारवाई झाल्याने राज्यभरात आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष पेटला आहे. राणे यांची जामिनावर सुटका झाली असली तरी तणाव कायम असून जिल्ह्यात शिवसेना खासदार यांच्या घरावर हल्ल्याचा प्रयत्न झाल्याचे वृत्त आहे. ( )

वाचा:

मुख्यमंत्री यांच्याबद्दल केंद्रीय मंत्री राणे यांनी जन आशीर्वाद यात्रेदरम्यान सोमवारी आक्षेपार्ह विधान केले. त्यानंतर मंगळवारी राज्यभरात त्याचे पडसाद उमटले. ज्या महाडमध्ये राणे यांनी हे विधान केले होते त्यासह नाशिक, मुंबई, ठाणे व अन्य ठिकाणी राणे यांच्याविरुद्ध शिवसेनेच्या तक्रारीवरून गुन्हे दाखल करण्यात आले. त्याचवेळी राज्यभर राणे यांच्याविरुद्ध उग्र निदर्शने करण्यात आली. राणे मंगळवारी संगमेश्वरमधील गोळवली येथे होते. तिथे जात रत्नागिरी पोलिसांनी राणे यांना दुपारी अटक केली. त्यानंतर रात्री उशिरा महाड येथे कोर्टात राणेंना हजर करण्यात आले व कोर्टाने त्यांना जामीन मंजूर केला.

वाचा:

एकीकडे राणे यांना जामीन मिळाल्याने तणाव निवळला असे वाटत असतानाच सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेना खासदार विनायक राऊत यांच्या घराला लक्ष्य करण्यात आले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात तळगाव येथे राऊत यांचा बंगला असून बंगल्यावर अज्ञात व्यक्तींनी सोडा बॉटल फेकून पळ काढल्याचे सांगण्यात येत आहे. चौघे जण बाइकवरून आले होते त्यांनी या बॉटल फेकल्याचेही सांगण्यात आले. यात कोणतंही नुकसान झालेलं नाही. याबाबत राऊत यांची प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही.

वाचा:

दरम्यान, राणे यांच्या विधानाबाबत राऊत यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून तक्रार केली आहे. नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. त्यांनी मुख्यमंत्र्यांचा अपमान केलाच आहे, शिवाय हा देशाच्या पंतप्रधानांचाही एकप्रकारे अपमान आहे, असे नमूद करत राऊत यांनी राणे यांची मंत्रिमडळातून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे. तळगावातील घटनेला या पत्राची पार्श्वभूमी असण्याची शक्यता आहे. या घटनेचा अधिक तपशील अद्याप मिळालेला नाही.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here