वाचा:
महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात भाजपनं काल मुंबईतील आझाद मैदानात धरणं आंदोलन केलं. आंदोलकांना संबोधित करताना फडणवीस यांनी वेगवेगळ्या विषयांवर सरकारवर हल्ले चढवले. महापुरुषांच्या अपमानाच्या मुद्द्यावरून त्यांनी शिवसेनेवरही टीका केली होती. महापुरुषांचा अपमान आम्ही सहन करणार नाही. शिवसेनेनं बांगड्या भरल्या असतील, आम्ही नाही, असं फडणवीस म्हणाले होते.
वाचा:
फडणवीसांच्या या टीकेला आदित्य ठाकरे यांनी ट्विटच्या माध्यमातून उत्तर दिलं आहे. आपल्या ट्विटमध्ये आदित्य म्हणतात, ‘शक्यतो राजकीय टीकेवर प्रतिक्रिया देण्याचं मी टाळतो. खरंतर फडणवीसांनी बांगड्या भरण्याचं जे वक्तव्य केलं आहे, त्याबद्दल माफी मागायला हवी. कारण, बांगड्या हे कमकुवतपणाचं लक्षण नाही. सर्वाधिक मजबूत असलेला महिला वर्ग बांगड्या घालतो. राजकारण होतच राहील. पण आपल्या डोक्यातील काही संकल्पना आपण बदलायला हव्यात. माजी मुख्यमंत्र्यांना तर ही भाषा अजिबात शोभत नाही.’
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times