मुंबई: राज्यात नारायण राणे विरुद्ध शिवसेना असा असलेला संघर्ष आता शिवसेना विरुद्ध भाजप असा सरकत असताना यात आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने युवा सेनेचे नेते यांच्याविरोधात आघाडी उघडली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जुहू येथील घरासमोर मोर्चा काढणारे वरून सरदेसाई यांनी करोना प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन केल्याचे सांगत त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी मनसेने केली आहे. मनसेने वरुण यांचा उल्लेख ‘सरकारी भाचा’ असा करत त्यांच्यावर टीकास्त्रही सोडले आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत अपमानजनक वक्तव्य केल्यानंतर त्याचे पदसाद महाराष्ट्रभर उमटले. ठिकठिकाणी शिवसैनिक रस्त्यावर उतरले. यात मुंबईत युवासेनेचे नेते वरुण सरदेसाई आघाडीवर होते.

मनसेने सरकारला विचारले आठ प्रश्न

मनसेचे अखिल चित्रे यांनी गृह विभागाला पत्र लिहिले असून त्यात त्यांनी आठ प्रश्न विचारले आहेत. आपल्याला तिसरी लाट किंवा डेल्टा प्लसची पूर्वकल्पना आहे. असे असतानाही तथाकथित युवानेते वरुण सरदेसाई हे मेळावे घेऊन राज्यातील तरुणांना काय संदेश देत आहेत?, या प्रश्नाबरोबरच राज्यात मराठी सण आणि समारंभ, सामाजिक कार्यक्रमांवर तसेच जनतेच्या महत्वाच्या प्रश्नांवर होणारी आंदोलांवर बंदी असताना ‘सरकारी भाचा’ कार्यकर्ता मेळावा कसा घेऊ शकतो?, असा प्रश्न विचारतानाच सरकारी आदेशाचे उल्लंघम केले म्हणून वरुण सरदेसाई यांच्यावर गुन्हा दाखल का होऊ नये, असा सवालही उपस्थित केला आहे.

क्लिक करा आणि वाचा-
या बरोबर ‘जनता निर्बंध पाळत नाही म्हणून आम्ही कडक लॉकडाउन लावणार’, आणि ‘मी जबाबदार’, असे म्हणून जनतेवर करोनाच्या महासाथीचे खापर फोडणारे सरकार सरकारी भाच्यावर इतके उदार का आहे?,

‘सरकार बेशिस्त भाच्याचा बंदोबस्त कधी करणार?’

कुणी भ्रष्ट किंवा बेशिस्त वागले तर छत्रपती शिवाजी महाराज त्या व्यक्तीचा तात्काळ बंदोबस्त करत असत. असे असताना मग अगदी आपल्या नातेसंबंधांतला का असेना, वारंवार शिवरायांचे नाव घेणारे हे सरकार ‘बेशिस्त भाच्याचा’ बंदोबस्त कधी करणार?, असा सवालही मनसेने विचारला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बैठकीत बसणारा हा ‘सरकारी भाचा’ करोनाच्या नियमांना जुमानत नाही का?, किंबहुना सरकारलाच जुमानत नाही का?, सरकारला नातेवाईकांपैकी कोणी आवाहन देत आहे का?, असा एकावर एक सवाल मनसेने विचारले आहेत.

क्लिक करा आणि वाचा-
या ‘सरकारी भाच्या’कडून राजकीय हेव्यादाव्यांसाठी आंदोलन करण्यासाठी गर्दी जमवली जाते, पोलीस कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या भगिनींना अत्यंत घाणेरड्या आवेशात शिवीगाळ केली जाते, असे असताना महाराष्ट्राच्या कायदा-सुव्यवस्थेला आव्हान देणाऱ्या या तथाकथित युवा नेत्याला विशेष सवलत का देण्य़आत येते? असा सवालही मनसेने उपस्थित केला आहे.

‘आम्ही न्यायालयीन लढाईसाठी सज्ज आहोत’

जर ही परिस्थिती असेल आणि सरकार ह्या अंतर्गत बेबंदशाहीपुढे हतबल झालेले असेल, तर आम्ही ह्या मोकाट भाच्यांच्या बेशिस्त वर्तवणुकीविरोधात न्यायालयीन लढाईसाठी सज्ज आहोत, असेही गृह विभागाला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here