अकोला : नारायण राणे यांना जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न झाला. महाराष्ट्र कदापी सहन करणार नाही. ज्या दिवशी महाराष्ट्राच्या हातामध्ये बटन येईल त्या तीन चाकाच्या ऑटोचे वाईट हाल होणार आहे. या ऑटोचे भंगारसुद्धा मार्केटमध्ये कोणी विकत घेणार नाही, असे टोला भाजपचे सरचिटणीस तथा माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसला लावला आहे.

शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते आज बोलत होते. पुढे ते म्हणाले, एक पोलीस आयुक्त पत्र लिहतो, नारायण राणे साहेबांना अटक करण्याकरिता जी पद्धती वापरण्यात आली जसे की ते शिवाजी महाराजांसारकीजे आहेत. एक पोलीस आयुक्त असे म्हणतो की, कोणतेही गुन्हे दाखल करा, नियमात बसत नसेल तरीही गुन्हे दाखल करा, असे म्हणतो आहे. असा आरोप बावनकुळेंनी केला आहे.

पोलीस हे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते म्हणून काम करताहेत. काही ठिकाणी शिवसेनेचे आणि काँग्रेसचे कार्यकर्ते म्हणून काम करताहेत, असा आरोप त्यांनी केला आहे. महाराष्ट्रातील पोलीस कधीही असा नव्हता. जगातील उत्तम पोलीस महाराष्ट्रातील आहे, असेही माजी केंद्रीय मंत्री बावनकुळे म्हणाले.

उद्या राज्य आमचं झालं तर आम्ही असं करायचं, त्यांचं आलं तर त्यांनी तसं करायचं काय होईल या महाराष्ट्राचे? त्यामुळे या पूर्ण घटनेवर लोक लक्ष देऊन आहेत. १२ कोटी जनता ही आंधळी नाही, सुसंस्कृत आहे. योग्यवेळी निर्णय करेल आणि उभ्या महाराष्ट्रात दिसेल असेही ते म्हणाले. छगन भुजबळ यांची शंभर कोटी संपत्ती जप्त केली. त्यावर छगन भुजबळ यांनी ही संपत्ती माझी नसल्याचे म्हणत असले तरी चौकशीच्यावेळी सर्व असेच म्हणत असतात, असेही ते म्हणाले.

या दरम्यान त्यांनी ओबीसी आणि मराठा आरक्षणसंदर्भात हे सरकार उदासीन असल्याचा आरोप केला आहे. तसेच पुढील निवडणुका या एसटी,एससी आणि ओपन करायच्या आहेत. म्हणजे बलाढ्य व श्रीमंत व्यक्तीला ओबीसीच्या गरीब जागेवर लढवायची आहे. या सरकारला ओबीसींवर अन्याय करायचा आहे असे दिसतेय. हा अन्याय करायचा नसेल तर अजूनही वेळ आहे. सप्टेंबर, ऑक्टोबर नोव्हेंबर या तीन महिन्यात ओबीसींचा डेटा तयार होऊ शकतो. डिसेंबरला आरक्षण टाकता येऊ शकतो. फेब्रुवारी, मार्चच्या महापालिकेच्या निवडणुकीत हे आरक्षण लागू शकते, असेही ते म्हणाले. परंतु या सरकारला असे करायचे नाही आहे, असा आरोप माजी ऊर्जा मंत्री बावनकुळे यांनी केला आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here