म. टा. प्रतिनिधी, पुणे

पोलिस आयुक्तालयातील एका उपनिरीक्षकाने मुंढवा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील हॉटेलमध्ये जाऊन दमदाटी करत उकळल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मुंढवा पोलिस ठाण्यात त्या उपनिरीक्षकावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (the of the was collecting the )

याबाबत मारूती कोंडीबा गोरे (वय ३१, रा. केदेश्वर कॉम्प्लेक्स, मांगडेवाडी, कात्रज) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार उपनिरीक्षक मिलन कुरकुटे (वय २८) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोरे याने लोकल हॉटेल, वन लॉन्ज, हॉटेल कार्निव्हल, हॉटेल धमका आणि हॉटेल मेट्रो येथून मंगळवारी रात्री दहा ते साडे दहा दरम्यान पैसे उकळ्याचे समोर आले आहे.

क्लिक करा आणि वाचा-
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंढव्यातील एबीसी रस्त्यावरील हॉटेल लोकल या ठिकाणी तक्रारदार हे मॅनेजर आहेत. मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास पोलिस गणवेशात एकजण हॉटेलमध्ये आला. त्याने मी पोलिस कमिशन ऑफिसमधून आलो असल्याचे सांगत कारवाईची धमकी दिली. कारवाई टाळण्यासाठी त्यांच्याकडे दोन हजार रूपयांची मागणी केली. त्यांच्याकडून दोन हजार रूपये घेत एकामधून निघून गेला. तसेच, हॉटेल वन लॉन्ज या ठिकाणी जाऊन देखील मॅनेजर साहिल पित्रे यांना कारवाईची भिती दाखवून दोन हजार रूपये घेतले. तर, हॉटेल कॉर्निव्हल येथून तीन हजार रूपये घेतले आहेत. तसेच, हॉटेल मेट्रो आणि हॉटेल धमका येथे येथे जाऊन खंडणीसाठी धमकाविल्याचे समोर आले आहे.

क्लिक करा आणि वाचा-
याप्रकरणी वरिष्ठ निरीक्षक ब्रम्हानंद नाईकवाडी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक एच. एस. गिरी हे अधिक तपास करत आहेत.

क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here