वाचा:
नारायण राणे यांच्या अटकेनंतर त्यांचे पुत्र आमदार नीतेश राणे यांनी ट्वीट केलं होतं. ‘करारा जवाब मिलेगा’ अशा आशयाचा एक व्हिडिओ त्यांनी ट्वीट केला होता. भाजपचे नेते अॅड. आशिष शेलार यांनीही पत्रकार परिषद घेऊन राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर आरोप केले होते. अनिल परब यांनी पदाचा गैरवापर केला आहे. राणेंना चुकीच्या पद्धतीनं अटक करण्यास पोलीस अधिकाऱ्यांना भाग पाडलं. तसंच, दलालांमार्फत न्यायालयीन प्रक्रियेत हस्तक्षेप केला. या सगळ्याची सीबीआय चौकशी करण्याची मागणी शेलार यांनी केली होती. ‘सुरुवात तुम्ही केलीय, शेवट आम्ही करू,’ अशी धमकीच शेलार यांनी महाविकास आघाडीला दिली होती.
वाचा:
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी भाजप नेत्यांच्या या इशाऱ्यांचा व धमक्यांचा कडक शब्दांत समाचार घेतला आहे. ‘भाजपच्या पोकळ धमक्यांना महाराष्ट्रातील कुठलाही नेता घाबरत नाही,’ असं मलिक यांनी म्हटलं आहे. ‘भाजपला जे करायचं आहे ते करावं. कुणाच्याही विरोधात तक्रार दाखल करावी. नकली केसमध्ये अडकवा किंवा जेलमध्ये ठेवा आणि सत्तेचा दुरुपयोगही करा. ही काही नवीन गोष्ट नाही,’ असंही मलिक यांनी म्हटलं आहे.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times