नारायण राणे यांना अटक झाली त्या दिवशी त्यांची तब्येत बिघडली होती. त्यावेळी त्यांचा रक्तदाब वाढला होता. तसेच त्यांच्या रक्तातीन साखर देखील वाढली होती. मात्र जन आशीर्वाद यात्रेला पुन्हा सुरुवात करण्यापूर्वी राणे यांनी लिलावती रुग्णालयात जाऊन आपली वैद्यकीय तपासणी करून घेतली. मात्र राणे यांची ही नियमीत तपासणी होती अशी माहिती भाजप नेते प्रसाद लाड यांनी दिली आहे.
क्लिक करा आणि वाचा-
जन आशीर्वाद यात्रेदरम्यान राणे काय बोलणार?
१७ सप्टेंबरला पुढील सुनावणी होईपर्यंत राणे यांनी वादग्रस्त वक्तव्ये करू नयेत असे मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश आहेत. त्यामुळे राणे पुढील यात्रेदरम्यान काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नारायण राणे यांनी शिवसेनेविरोधात वक्तव्ये केल्यास कोकणात त्यांची जन आशीर्वाद यात्रा होऊ देणार नाही, असा इशारा शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी दिला आहे. त्यामुळे सिंधुदुर्गात शिवसेना विरुद्ध राणे संघर्ष तीव्र होणार का अशीही चर्चा आहे.
क्लिक करा आणि वाचा-
रत्नागिरीतील राणेंच्या जन आशीर्वाद यात्रेचे वेळापत्रक:
सकाळी १० वाजता- रत्नागिरीतील मारुती मंदिराजवळील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला माल्यार्पण.
सकाळी १०.१५ वाजता- कैलासवासी श्री. शामराव पेजे पुतळ्याला माल्यार्पण.
सकाळी १०.२५ वाजता- डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला माल्यार्पण.
सकाळी १०.५० वाजता- विजय देसाई फॅक्टरी गोळप येथे आंबा बागायतदार, आंबा कॅनिंग काजू उत्पादक प्रतिनिधींशी चर्चा आणि सत्कार.
सकाळी ११.३५ वाजता- भाजपा कार्यालय येथे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन व सत्कार.
दुपारी १२,१५ वाजता- विविध प्रतिनिधी मंडळांना भेटी.
दुपारी १ वाजता- लोकमान्य टिळक जन्मस्थान भेट.
दुपारी १.१० वाजता- स्वातंत्र्यवीर सावरकर पुतळा माल्यार्पण.
दुपारी १.१५ ते दुपारी २ वाजेपर्यंत असेल राखीव वेळ.
दुपारी २.३० वाजता- व्यंकटेश एक्झिक्युटिव्ह हॉटेलमध्ये पत्रकार परिषद.
दुपारी ३.१० वाजता- कुवारबाव भाजपा कार्यालय येथे सदिच्छा भेट व लाभार्थी नागरिकांची भेट.
दुपारी ३.४५ वाजता- लांजा येथे कार्यकर्त्यांना भेट व सत्कार.
संध्याकाळी ४.२५ वाजता- राजापूर येथे कार्यकर्त्यांची भेट आणि सत्कार.
क्लिक करा आणि वाचा-
Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News – Maharashtra Times