मुंबई: राज्यात आज करोनातून बरे झालेल्या रुग्णांच्या तुलनेत नवीन बाधित रुग्णांची संख्या अधिक राहिली. दिवसभरात ५ हजार १०८ नवीन रुग्णांचे निदान झाले तर ४ हजार ७३६ रुग्ण बरे होऊन घरी परतले. करोनामुळे गेल्या २४ तासांत आणखी १५९ रुग्ण दगावले असून राज्यातील मृत्यूंची एकूण संख्या आता १ लाख ३६ हजार ७३० इतकी झाली आहे. ( )

वाचा:

राज्यात करोनाची दुसरी लाट नियंत्रणात आली असली तरी दैनंदिन नवीन करोना बाधित रुग्णांची संख्या अजूनही पाच हजारच्या घरात आहे. रुग्णसंख्येला ब्रेक लावण्याचे आव्हान आरोग्य यंत्रणेपुढे कायम आहे. जिल्ह्यात सर्वाधिक सक्रिय रुग्ण आहेत. आजच्या नोंदीनुसार जिल्ह्यात १३ हजार ८५ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. त्यानंतर जिल्ह्यात ७ हजार ९२, सातारा जिल्ह्यात ५ हजार ३८१, सांगली जिल्ह्यात ४ हजार ६९१, अहमदनगर जिल्ह्यात ४ हजार ५७५ तर महापालिका क्षेत्रात ३ हजार १७६ सक्रिय रुग्ण आहेत. राज्यातील सक्रिय रुग्णसंख्या आता ५० हजार ३९३ इतकी खाली आली आहे. येत्या काळात अनेक प्रमुख सण असल्याने ही स्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी आरोग्य यंत्रणा सक्रिय झाली आहे.

वाचा:

करोनाची राज्यातील आजची स्थिती

– राज्यात आज १५९ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
– सध्या राज्यातील २.१२ % एवढा आहे.
– गेल्या २४ तासांत राज्यात ५,१०८ नवीन रुग्णांचे निदान.
– आज ४,७३६ करोना बाधित रुग्ण बरे होऊन परतले घरी
– राज्यात आजपर्यंत एकूण ६२,५२,१५० करोना बाधित झाले बरे.
– राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९७.०४% एवढे.
– आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५,३०,४८,०७० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६४,४२,७८८ (१२.१५ टक्के) नमुने पॉझिटिव्ह.
– सध्या राज्यात २,९३,१४७ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत तर २,३३४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here