मुंबई: हिंदी सिनेसृष्टीचे महानायक यांच्या सुरक्षेत तैनात करण्यात आलेले पोलीस कॉन्स्टेबल यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. त्यांना डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात ड्युटी देण्यात आली आहे. अमिताभ बच्चन यांच्या सुरक्षेत असताना जितेंद्र शिंदे हे करत असलेली कमाई हे बदलीचं कारण असल्याचं सांगण्यात येतं. (‘s Police Bodyguard Shunted)

देशातील बड्या व्यक्तींना व सेलिब्रिटींना आवश्यकतेनुसार पोलीस सुरक्षा पुरवली जाते. अमिताभ बच्चन यांना एक्स दर्जाची सुरक्षा व्यवस्था आहे. दोन कॉन्स्टेबल सतत त्यांच्यासोबत असतात. शिंदे हे त्यापैकी एक आहेत. शिंदे हे २०१५ पासून अमिताभ यांच्या सुरक्षेत होते. कुठल्याही पोलीस कॉन्स्टेबलला पाच वर्षांपेक्षा जास्त काळ एकाच ठिकाणी ड्युटी लावली जाऊ नये, अशा सूचना पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी दिल्या आहेत. त्यानुसार ही बदली झाल्याचं सांगितलं जातं. मात्र, शिंदे यांना अमिताभ यांच्याकडून वर्षाला दीड कोटी रुपये मिळत होते. म्हणजे महिन्याला त्यांची कमाई १२ लाखांच्याही वर होती. हे त्यांच्या बदलीचं प्रमुख कारण असल्याचं सूत्रांकडून समजतं.

वाचा:

शिंदे यांची विभागीय चौकशी केली जाण्याची शक्यता आहे. त्यांचं वार्षिक उत्पन्न व मालमत्तेचीही चौकशी होणार आहे. शिंदे यांची स्वत:ची खासगी सुरक्षा रक्षक एजन्सी आहे. त्यांची पत्नी या एजन्सीचा कारभार बघत असून सेलिब्रिटिंना या एजन्सीकडून सुरक्षा पुरवली जाते, अशीही माहिती समोर आली आहे. ‘शिंदे यांना आधी कारणे दाखवा नोटिस दिली जाणार असून त्यांच्याकडून प्राथमिक माहिती घेतली जाणार आहे. पोलीस कर्मचारी म्हणून मिळणाऱ्या पगाराव्यतिरिक्त शिंदे यांना अन्य एखाद्या एजन्सीकडून पैसे मिळत होते का, याची चौकशी केली जाणार असल्याची माहिती एका पोलीस अधिकाऱ्यानं टाइम्स ऑफ इंडियाला दिली. ‘नियमानुसार कुठलाही सरकारी कर्मचारी दोन ठिकाणांहून पगार घेऊ शकत नाही. शिंदे यांनी या नियमाचा भंग केल्याचं निदर्शनास आल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असंही या अधिकाऱ्यांना सांगितलं.

बदली होऊ नये म्हणून दबाव?

अमिताभ बच्चन यांचा जितेंद्र शिंदे यांच्यावर प्रचंड विश्वास आहे. शिंदे हे सावलीसारखे अमिताभ यांच्यासोबत असायचे. त्यामुळं त्यांची बदली केली जाऊ नये यासाठी मुंबई पोलिसांवर दबाव असल्याचंही समजतं.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here