रत्नागिरी: ‘महाराष्ट्रात आज जे काही असहिष्णुतेचं वातावरण तयार झालं आहे, त्याचे जनक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आहेत,’ अशी टीका भाजपचे आमदार अॅड. यांनी आज केली. ( attacks CM )

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेला आज रत्नागिरीतून पुन्हा सुरुवात झाली आहे. या निमित्तानं रत्नागिरी जिल्हा कार्यालयात कार्यकर्त्यांशी संवाद साधताना शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. ‘महाराष्ट्रातील असहिष्णुतेचे जनक उद्धव ठाकरे हेच आहेत. वडाळ्यातील एका व्यक्तीनं सरकार विरोधी लिहिलं म्हणून त्याचं सार्वजनिक ठिकाणी केशवपन करण्यात आलं. एका निवृत्त नौदल अधिकाऱ्यांनी एक व्यंगचित्र फॉरवर्ड केलं म्हणून त्यांचा डोळा फोडण्यात आला तर अभिनेत्री कंगना राणावत हिचं घर तोडण्यात आलं. सरकार विरोधात बोललं म्हणून एका संपादकाला घरात घुसून अटक केली गेली. या सगळ्यामागे उद्धव ठाकरे आहेत, असा आरोप शेलार यांनी केला.

वाचा:

‘स्वातंत्र्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे अशी सिंहगर्जना लोकमान्य टिळकांनी केली. त्याच महाराष्ट्रात आज मुख्यमंत्री फक्त ‘माझं, कुटुंब, माझी जबाबदारी’ हाच माझा जन्मसिद्ध हक्क आहे, या धोरणानं काम करीत आहेत. उद्धव ठाकरेंची शिवसेना कोकण विरोधी आहे. नारायण राणे मुख्यमंत्री झाले, त्यांच्या विरोधात उद्धव ठाकरे यांनी षडयंत्र केलं. सुरेश प्रभू यांना देखील अपमानास्पद वागणूक उद्धव ठाकरे यांनी दिली होती. रामदास कदम यांच्याही बाबतीत तेच झालं, अन्य नावं मी घेत नाही. आता नारायण राणे यांना केंद्रीय मंत्रीपद मिळालं त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. कोकणाला काही मिळालं की उद्धव ठाकरे यांच्या पोटात का दुखतं? असा सवाल पुन्हा एकदा शेलार यांनी केला. येत्या काळात कोकणातील जनता हा संताप दाखवून देईल’, असा इशाराही त्यांनी दिला.

वाचा:

Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News – Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here