: कोकणात जन आशीर्वाद यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाल्यानंतर केंद्रीय मंत्री (Narayan Rane) यांनी पुन्हा एकदा आणि (CM Uddhav Thackeray) यांच्यावर हल्लाबोल केला आहे. राणेंच्या आक्रमक भूमिकेमुळे भविष्यात भाजप-शिवसेना युतीची शक्यता संपुष्टात येत आहे का, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. अशातच जर कधी भाजप-शिवसेना युती झाली तर ते काय भूमिका घेणार, असा प्रश्न नारायण राणेंना विचारण्यात आला. त्यावर बोलताना राणे यांनी सावध भूमिका घेतली आहे.

‘मी भविष्यातील प्रश्नांबाबत उत्तर देत नाही. मात्र जर युती झालीच तर आमचे प्रमुख नेते जे बोलतील ते मला मान्य असेल,’ असं नारायण राणे यांनी म्हटलं आहे.

ठाकरे कुटुंब पुन्हा राणेंच्या निशाण्यावर
मुख्यमंत्र्यांविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याने नारायण राणे यांनी काही दिवसांपूर्वी अटक झाली होती. या अटकनाट्याबाबत राणेंनी पुन्हा एकदा भाष्य केलं आहे. ‘मी केंद्रीय मंत्री आहे, मला कायदा चांगला कळतो. ज्या पोलीस अधिकाऱ्याने पुरुषार्थ दाखवला त्याला सीमेवर पाठवा. मला अटक करायला येणारा अधिकारी कापत होता, मीच गाडीत बसलो,’ असा दावा राणेंनी केला आहे.

संजय राऊत यांच्यावर सडकून टीका
शिवसेना नेतृत्वावर टीका झाल्यानंतर पक्षाचे खासदार संजय राऊत हे सातत्याने पुढे येत विरोधकांवर पलटवार करत असतात. राऊत यांनी नुकतीच नारायण राणे यांच्यावरही विखारी टीका केली होती. या टीकेला आता राणेंनीही जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. राणे म्हणाले की, ‘संजय राऊत हे बेसलेस बडबड करत असतात. आम्ही आंदोलनातून मोठे झालो, १५ वर्षांचा असताना सेनेत गेलो, तेव्हा कोणीही नव्हते, राऊतही नव्हते. राऊत या खासदाराने काय काम केलं? कोणता प्रकल्प आणला?’ असा सवाल त्यांनी विचारला आहे.

दरम्यान, पोलीस कारवाईनंतरही नारायण राणे यांचा आक्रमक बाणा कायम आहे. त्यामुळे आगामी काळात राणे विरुद्ध शिवसेना हा राजकीय संघर्ष नेमका कोणत्या वळणावर जाऊन पोहोचणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News – Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here