लांजा (रत्नागिरी): केंद्रीय मंत्री यांनी देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाबाबत मुख्यमंत्री यांचे अज्ञान उघड केले म्हणून एवढा मोठा थयथयाट केलात का?, असा सवाल करीत नेते, आमदार अ‍ॅड. यांनी ‘हम किसी को छेडेंगे नहीं, कोई हमको छेड़ेगा तो उसको छोड़ेंगे नहीं’, असा इशारा दिला. ( )

वाचा:

नारायण राणे यांची अटक आणि सुटका झाल्यानंतर आजपासून रत्नागिरी जिल्ह्यातून पुन्हा निघाली आहे. यात्रेदरम्यान आज लांजा येथे संवाद सभा झाली यावेळी बोलताना आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली. मंत्री नारायण राणे यांना झालेली अटक आणि शिवसेनेने केलेला तमाशा याचे खरे कारण काय होते? मुख्यमंत्र्यांचे अज्ञान राणे यांनी उघड केले म्हणून एवढा राग आला का?, असा खोचक सवाल शेलार यांनी केला.

वाचा:

मंत्रालयासमोर याच महिन्यात सुभाष जाधव या शेतकऱ्याने आत्महत्या केली तर इंदापूरचे शिवाजी चितळकर यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्या यांच्या सभेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पालघरमध्ये आदिवासी काळू पवार याने मुलाच्या अंत्यसंस्कारासाठी पाचशे रुपये कर्ज घेतले त्या प्रकरणी छळ झाला म्हणून आत्महत्या केली. या घटनांतून राज्य सरकारविषयी असलेला असंतोष प्रकट होऊ लागला आहे. या घटनांवरून जनतेचे लक्ष विचलीत करण्यासाठी राणे यांना अटक व त्यानिमित्ताने हिंसक घटना घडविल्या जात असाव्यात असा संशय येतो, असा आरोपही शेलार केला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विविध योजनांचा उहापोह त्यांनी आपल्या भाषणात केला.

वाचा:

रत्नागिरी येथे बोलतानाही शेलार यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर निशाणा साधत उद्धव ठाकरे हे महाराष्ट्रातील असहिष्णुतेचे जनक असल्याची टीका केली होती. स्वातंत्र्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे अशी सिंहगर्जना लोकमान्य टिळकांनी केली पण त्याच महाराष्ट्रात आज मुख्यमंत्री फक्त माझं कुटुंब, माझी जबाबदारी हाच माझा जन्मसिद्ध हक्क आहे, या धोरणाने काम करीत आहेत, असा टोला शेलार यांनी लगावला होता. उद्धव ठाकरेंची शिवसेना कोकण विरोधी आहे. ज्यावेळी कोकणचे सुपुत्र नारायण राणे मुख्यमंत्री झाले त्यावेळी त्यांच्या विरोधात उद्धव ठाकरे यांनी षडयंत्र केले. ते केंद्रात मंत्री झाले तर त्यांना अटक करण्यात आली. सुरेश प्रभू यांनासुद्धा तेव्हा अपमानास्पद वागणूक दिली गेली. रामदास कदम यांच्याही बाबतीत तेच झाले. अन्य नावे मी घेत नाही, असे सांगताना कोकणाला काही मिळालं की उद्धव ठाकरे यांच्या पोटात का दुखतं?, असा सवाल शेलार यांनी केला होता.

वाचा:

Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News – Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here