कोहली आणि पुजाराने कोणती एकच गोष्ट करायला हवी, पाहा…तिसऱ्या दिवसअखेर कोहली आणि पुजारा यांनी तिसऱ्या विकेसाठी अभेद्य भागीदारी रचली. पण त्यांना एवढ्यावरच समाधान मानून चालणार नाही. कारण सामन्याचा चौथा दिवस हा दोन्ही संघांसाठी महत्वाचा ठरू शकतो. त्यामुळे भारताला जर चौथ्या दिवशी धावांचा डोंगर उभारायचा असेल तर कोहली आणि पुजारा यांना पहिला तास संयमीपणे खेळून काढावा लागेल. कारण पहिल्या तासामध्ये वेगवान गोलंदाजांना चांगली मदत मिळू शकते आणि त्यावेळी जर भारताने विकेट्स गमावल्या तर त्यांना पराभवही पत्करावा लागू शकतो. पण कोहली आणि पुजारा यांनी हा पहिला तास व्यवस्थितपणे खेळू काढला तर भारतीय संघ चौथ्या दिवशी मोठी धावसंख्या उभारू शकतो. चौथ्या दिवशी जर पहिल्या तासाभरात भारताने एकही विकेट गमावली नाही तर त्यांना पूर्ण दिवस फलंदाजी करून धावांचा डोंगर उभारता येऊ शकतो. त्यामुळे चौथ्या दिवसाचा पहिला तास हा भारतीय संघासाठी फार महत्वाचा असेल. त्यामुळे चौथ्या दिवसाच्या पहिल्या तासात कोहली आणि पुजारा कशी फलंदाजी करतात, यावर संघाचे या कसोटीतील भवितव्य अवलंबून असेल.
चौथ्या दिवशी खेळपट्टी कशी असेल, जाणून घ्या…चौथ्या दिवशी आता खेळपट्टीमध्ये मोठा बदल होणार आहे. सामन्याच्या चौथ्या दिवसापासून खेळपट्टी ही फलंदाजीसाठी अधिक चांगली होणार आहे. त्यामुळे भारताच्या पथ्यावर ही गोष्ट पडणार आहे. त्याचबरोबर सामन्याच्या चौथ्या दिवसापासून खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजांना जास्त मदत मिळणार नाही. पण चौथ्या दिवशी भारतीय फलंदाजांना एक गोष्ट करावी लागेल, ती म्हणजे त्यांना चौथ्या दिवसाचा पहिला तास संयमीपणे खेळावा लागेल. जर भारतीय संघाने पहिल्या तासात एकही विकेट गमावली नाही तर दिवसभर या खेळपट्टीवर ते मोठी धावसंख्या उभारू शकतात.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times