म. टा. विशेष प्रतिनिधी,
‘ऑक्टोबर-२०१९मध्ये झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मुंबईतील चांदिवली विधानसभा मतदारसंघाच्या (१६८) निवडणुकीत गैरप्रकार व भ्रष्ट कृतींचा वापर करत शिवसेनेचे दिलीप लांडे जिंकले. त्यामुळे त्यांची निवडणूक रद्द करावी’, अशा विनंतीची निवडणूक याचिका काँग्रेसचे नेते व तत्कालीन निवडणुकीतील काँग्रेसचे उमेदवार मोहम्मद आरिफ नसीम खान यांनी मुंबई उच्च न्यायालयात केली आहे.

महत्त्वाचे म्हणजे, मतदानाआधीच्या प्रतिबंधित ४८ तासांत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही नियमांचे उल्लंघन करत गैरप्रकारांत सहभागी सहभाग घेतला, असा आरोप करत त्याविषयीचे सीसीटीव्ही फुटेज गोळा करण्याचे निर्देश देण्याची विनंतीही खान यांनी अॅड. बिपीन जोशी यांच्यामार्फत केलेल्या याचिकेत केली आहे.

वाचा:

‘२१ ऑक्टोबर २०१९ रोजी विधानसभेची निवडणूक झाली. मतदानाची तारीख जवळ आली असतानाच, मी १३ फेब्रुवारी २०१६ रोजी साकीनाकामधील खैरानी रोड येथील महापालिका उद्यानात झालेल्या सभेच्या वेळी केलेल्या भाषणातील एक वक्तव्य जाणीवपूर्वक तोडूनमोडून पसरवण्यात आले. आज यमुना के किनारे दिल्ली में श्री श्री रवी शंकर ने पाकिस्तान झिंदाबाद लगाया, राजनाथ सिंग की मौजुदगी में, उनपर देशद्रोह का मुकदमा चलेगा की नहीं.. असे विधान मी केले होते. मात्र, त्यातील केवळ पाकिस्तान झिंदाबाद हे शब्द माझ्या तोंडी दाखवणारा व्हिडीओ व्हायरल करून मी पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा दिल्या, असे सोशल मीडियावर पसरवण्यात आले. त्याचे पडसाद उमटले आणि माझ्याविरोधात लोकांमध्ये गैरसमज निर्माण झाला. माझी बदनामीही झाली. मी पूर्वी कुर्ला मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने पाच वेळा विधानसभा निवडणूक जिंकली. केवळ २०१९मध्ये चांदिवली मतदारसंघातून अवघ्या ४०९ मतांच्या फरकाने हरलो. त्यात माझ्याविरुद्धच्या या अपप्रचाराचाच मोठा वाटा आहे. या अपप्रचाराविषयी माझ्यातर्फे पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली. निवडणूक अधिकाऱ्यांकडेही मी तक्रार नोंदवली आणि महत्प्रयासाने प्रसारमाध्यमांनाही तो व्हिडीओ खोटा असल्याचे पटवून दिल्यानंतर माझी बाजू समोर आले. मात्र, तो वादग्रस्त व्हिडीओ पाहून अखंड राजपुताना सेवा संघनेही मला कायदेशीर नोटीस दिली. त्यांनाही मी हा अपप्रचार असल्याचे सांगितले. मात्र, तरीही या समुदायाच्या सुमारे दहा हजार मतदारांनी मला मतदान केले नाही आणि त्याचा फटका मला बसला. शिवसेनेच्या उमेदवारासाठी उद्धव ठाकरे, अनिल परब आदी नेत्यांनी प्रतिबंधित ४८ तासांतही प्रचार केला. त्याविरोधातील तक्रारीचीही निवडणूक अधिकाऱ्यांनी दखल घेतली नाही’, असा आरोप खान यांनी याचिकेत केला आहे.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here