सिंधुदुर्ग: शिवसेनेचे खासदार आणि राणे कुटुंबीयांचे सुरू झालेले वाकयुद्ध शमताना दिसत नाही. भाजप नेते, माजी खासदार आणि केंद्रीय मंत्री यांचे पुत्र यांनी खासदार संजय राऊत यांच्या टीकेला जोरदार प्रत्यु्त्तर दिले आहे. संजय राऊत जेथे दिसतील तेथे त्यांचा करू, असा इशारा नीलेश राणे यांनी संजय राऊत यांना दिला आहे. यामुळे शिवसेना विरुद्ध राणे कुटुंबीय वाद हा अधिकच वाढणार की काय अशी चर्चा राजकीय वर्तुळात होऊ लागली आहे. (bjp leader criticizes shiv sena mp )

माजी खासदार नीलेश राणे हे एका वृत्त वाहिनीशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी हा इशारा दिला आहे. नारायण राणे यांना अटक झाल्यानंतर शिवसेना विरुद्ध राणे कुटुंबीयांचा वाद अधिकच तीव्र बनला आहे. त्यात खासदार संजय राऊत यांनी नाशिकमध्ये बोलताना करेक्ट कार्यक्रमाचा उल्लेख करत भाष्य केले होते. आम्ही आणखी एखादा करेक्ट कार्यक्रम करू असे राऊत म्हणाले होते. त्यावर पलटवार करताना राणे यांनी हा इशारा दिला आहे.

क्लिक करा आणि वाचा-
खासदार संजय राऊत यांच्यावर टीकास्त्र सोडताना नीलेश राणे म्हणाले की, करेक्ट कार्यक्रम म्हणजे काय?, संजय राऊत हा बोगस माणूस आहे. आम्ही जिथे दिसेल तिथे संजय राऊतांचा कार्यक्रम करू.

क्लिक करा आणि वाचा-
राऊत यांच्यावर निशाणा साधत असताना नीलेश राणे यांनी शिवसेनेवरही टीकास्त्र सोडले आहे. शिवसेनेला आम्ही भीक घालत नाही, असा प्रहार करत जन आशीर्वाद यात्रा आम्ही पूर्ण करणारच, असे ते म्हणाले. शिवसेनेकडे आचार-विचार राहिले नाहीत. केवळ शिवसेना अडवा अडवीची कामे करत आहे. आम्ही त्यांना काडीचीही किंमत देत नाही. संजय राऊत यांनी एकदा आमच्या गर्दीत उभ रहावे आणि मग साहेबांचे विचार काय आहेत ते पहावे, असा टोलाही राणे यांनी राऊत यांना लगावला.

क्लिक करा आणि वाचा-
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करण्यासाठी सगळी यंत्रणा कामाला लावण्यात आली. असे असले तरी ते मात्र काही करू शकले नाहीत. एक दिवस तरी त्यांना ठेवायचे होते, असेही ते म्हणाले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here