केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) केलेल्या प्राथमिक चौकशीत राज्याचे माजी गृहमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अनिल देशमुख यांना ‘क्लीन चिट’ देण्यात आली असल्याचा दावा करणारी कागदपत्रे गेल्या दोन दिवसांपासून विविध समाजमाध्यमांमध्ये फिरत आहेत. या कागदपत्रांच्या विश्वासार्हतेबद्दल प्रश्नचिन्ह असले तरी यावरून राजकीय वर्तुळात मात्र जोरदार चर्चा सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे.
वाचाः
‘सीबीआयच्या प्राथमिक अहवालाच्या बातम्या आज काही वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाल्या आहेत. तर, सोशल मीडियावर तो अहवाल पीडीएफमध्ये फिरत आहे. हा अहवाल सीबीआयच्या फाईलमधील किंवा खात्यातंर्गत आहे की बनावट करुन तो वायरल करण्यात आला आहे याची सर्वस्वी जबाबदारी सीबीआयची आहे,’ असं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.
वाचाः
‘या देशात खोट्या बातम्यांचा वायरससारखा फैलाव होतोय. शासनकर्ते सगळी सत्य माहिती देत नाही ती मिडियाने शोधून काढली पाहिजे ही मिडियाची जबाबदारी असल्याचे देशाचे मुख्य न्यायाधीश चंद्रचूड यांनी सांगितले आहे. हा विषय गंभीर आहे. एखाद्या व्यक्तीवर आरोप झाले. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. जर हे कागद सत्य आणि त्या फाईलमधील असतील तर यापेक्षा राजकीय सूडबुध्दीने कुठलीही कारवाई होवू शकत नाही. त्यामुळे या प्रकरणाचा आणि ही बातमी खोटी आहे याबाबतचा खुलासा सीबीआयने करावा,’ असं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.
वाचाः
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times