रत्नागिरी : रविवारी २९ ऑगस्ट रोजी आज दुपारी दीड वा.च्या सुमारास मुंबई-गोवा महामार्गावर एसटी बसला अपघात झाला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात खेड तालुक्यात कशेडी जुना एस.टी. चेकपोस्ट याठिकाणी मुंबईकडून रत्नागिरीकडे जाणारी भिवंडी रत्नागिरी एसटी बस व डंपरला महामार्गावर मोठा अपघात झाला आहे. यात तब्बल वीस प्रवासी किरकोळ जखमी तर एकजण गंभीर जखमी आहे. गंभीर प्रवाशाला चिपळूण डेरवण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मुंबई-गोवा महामार्गावर खेड तालुक्यात कशेडी जुना एस.टी. चेकपोस्ट याठिकाणी मुंबईकडून रत्नागिरी एसटी बस व मुंबईकडे जाणारा डंपर या दोन वाहनांमध्ये कशेडी घाटामध्ये समोरासमोर टक्कर होऊन अपघात झाला आहे. त्याला तसेच इतर जखमींना ग्रामीण रुग्णालय कळंबणी खेड येथे उपचाराकरिता खाजगी रुग्णवाहिकेने दाखल करण्यात आले आहे.

दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अपघाताबाबत नजीकचे खेड पोलीस ठाणे येथे कळवीणेत आले असुन अपघात नोंद करण्याचे काम सुरू आहे. महामार्गावर एकेरी वाहतूक सुरळीत चालू आहे. घटनेचे वृत्त कळताच खेड महामार्ग पोलिस निरीक्षक बोडकर, सहाय्यक पोलीस हवालदार समल सुर्वे मदत ग्रुपचे प्रसाद गांधी घटना स्थळी दाखल झाले आहेत. सद्यस्थितीत या महामार्गावर एकेरी वाहतूक दुपारी ४ वा.पर्यंत सुरु होती. पोलीस घटनास्थळी थांबून वाहतुक सुरळीत करत आहेत.

Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News – Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here