मुंबई: स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या गौरव प्रस्तावासाठी आग्रह धरणारे विरोधी पक्षनेते हेच सावरकरांचा अपमान करत आहेत, असा आरोप जलसंपदामंत्री यांनी आज विधानसभेत केला. त्यामुळं भाजपची चांगलीच गोची झाली.

वाचा:

विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज तिसरा दिवस होता. सावरकरांच्या पुण्यतिथीचं औचित्य साधून विधानसभेत आज मंजूर करावा, अशी मागणी भाजपनं अध्यक्षांकडं केली होती. कामकाज सुरू होताच सुधीर मुनगंटीवार यांनी प्रस्तावावर भाजपची भूमिका मांडली. देवेंद्र फडणवीस यांनी त्यास अनुमोदन देताना काँग्रेसचं मुखपत्र असलेल्या ‘शिदोरी’ मासिकातून सावरकरांबद्दल लिहिलेल्या आक्षेपार्ह लिखाणाचा उल्लेख केला. तसंच, शिदोरी मासिकावर बंदी घालण्याची मागणी केली. मात्र, ते करताना फडणवीस मासिकातील टिपणंही वाचून दाखवत होते. शिदोरी मासिकात सावरकरांना ‘बलात्कारी’ असं संबोधण्यात आलं आहे. हे सांगताना फडणवीस ‘बलात्कारी’ हा उल्लेख वारंवार करत होते. सावरकरांना बलात्कारी म्हणणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे, असं ते म्हणाले.

सत्ताधारी बाकावरून जयंत पाटील यांनी त्यास जोरदार आक्षेप घेतला. महापुरुषांच्या गौरवपर प्रस्तावाची मागणी करणं याला कोणाचाच आक्षेप असू शकत नाही. मात्र, तसं करताना विरोधी पक्ष नेत्यांकडून संबंधित महापुरुषांचाच अपमान होत आहे, असं पाटील यांनी निदर्शनास आणलं.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here